Home Breaking News Varora city@ news •वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 वा वर्धापन दिन साजरा

Varora city@ news •वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 वा वर्धापन दिन साजरा

56

Varora city@ news

•वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 वा वर्धापन दिन साजरा

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा:युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन कल्याणकारी राज्याच्या निर्मिती साठी आपण सर्वजण आपल्या पक्षाच्या 10 जून 2024 ते 17 जून 2024 चा काळावधीत आपण आपल्या पक्षाच्या 25 वा वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन सप्ताह जोमाने साजरा करण्यात येत आहे.
दिनांक 10 जून 2024 ला सकाळी 10.10 वा ध्वजारोहण करण्यात आला.

ध्वजारोहण नंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारताच्या राज्यघटनेतील उद्देशिका चे वाचन करण्यात आले.
वरोरा विधानसभा मतदारसंघातील गाव पातळीतील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचे जेष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना शतायुषी व्हा च्या शुभेच्छा देऊन त्यांच्या शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
1 गो. थुटे, झामराव लांबट -87,तानेबाई लांबट -82,डोमाजी वाटेकर -87, त्रिवेणी वाटेकर -84, गणपत वांगे -84, बारकू एकरे -89,सुमनबाई तिखट -86, नानाजी मुसळे -81, त्रवेना मुसळे -81, सुनीता आवारी -81इत्यादी मान्यवरांचे सन्मान करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलासराव नेरकर, रंजना पारशिवे, जनाबाई पिपंळशेडे, चंद्रकांत कुंभारे, रवींद्र भोयर, योगिता लांडगे, सुनीता नरडे, दिलीप खैरे, सुधाकर उपरे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते