⬜अम्मा ⬜
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)
⬜शोकाकूल झाली
सारी चंद्रपूर नगरी
किशोर जोरगेवारांची
माऊली जाता देवाघरी //१//
⬜निराधार गरिबांच्या
सेवेसाठी झटल्या आयुष्यभर
समाज सेवेचे व्रत जपले
त्यांनी अखंड जीवनभर//२//
⬜अम्मा का टिफीन
अम्मा का दुकान
उपक्रमातून सुरू केला
आदर्श समाजसेवेचा नवा निर्माण //३//
⬜कष्टमय आणि सेवाभावी
व्यक्तिमत्व होते त्यांचे
अनेकांना देऊन आधार
आयुष्य फुलवले तयांचे //४//
⬜अनेक पुरस्कारांच्या मानकरी
सुप टोपल्या विकायच्या
नाही केला गर्व कधी
आनंद देत जगायच्या //५//
⬜त्यांनी केलेल्या कार्याच्या
राहिल्या आता आठवणी
दाटून आला कंठ आणि
नयनातून पाणी //६//
🌼⬜🌼कु. मंगल शामराव मिसाळ ठाणे 🔲
⬜🔲⬜महाराष्ट्रातील सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ठाणे
