Varora taluka@ news
•महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटने तर्फे मुख्य अभियंता यांचे सत्कार
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
चंद्रपूर :- चंद्रपूर झोन अंतर्गत येत असलेल्या वरोरा , चंद्रपूर, बल्लारपूर या तिन्ही डिव्हिजन मध्ये नियमित कामगारांच्या रिक्त असलेल्या जागेवर कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले तंत्रज्ञ व उपकेंद्र साहाय्यक यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघटनेतर्फे ६ जूनला महावितरण कंपनीचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून कंत्राटी कामगारांच्या समस्याचे निराकार करणारे व कोर्ट केस माध्यमातून कामगारांना न्याय देणारे महावितरण कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक रामचंद्र वैदकर व सुशिल विखार तसेच मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांच्या वाढदिवस तसेच वर्धापन दिनानिमित्त संघटनेमार्फत पुष्प गुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात कंत्राटदाराशी चर्चा सुध्दा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज गेडे सोबत संघटनेचे सचिव अंकुश डोंगरवार, कोषाध्यक्ष स्वप्निल तराळे, जितेंद्र काळे,महादेव सिडाम, सचिन पुसदेकर, दिलीप भगत,दिपक उमरगुंडावार, मिथुन गायकवाड,विषीन कोयचाडे तसेच सुरक्षारक्षक महामंडळ चे अध्यक्ष जगजिवन दुधे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मुख्य अभियंता सुनिल देशपांडे साहेब यांना वाढदिवसा निमित्त पुढिल आयुष्य आनंदमय व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .चंद्रपूर झोनमध्ये संघटनेचे पदाधिकारी कंपनीच्या उन्नती करीता सहकार्य करतील असे आश्वासन महावितरण कंपनीला देण्यात आले.