Home Breaking News Chandrapur city@ news •पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे बकरी ईद सणा निमित्त कुरेशी...

Chandrapur city@ news •पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे बकरी ईद सणा निमित्त कुरेशी समाजाची बैठक संपन्न!

197
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1,"transform":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Chandrapur city@ news
•पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे बकरी ईद सणा निमित्त कुरेशी समाजाची बैठक संपन्न!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर(वि.प्र.)सोमवार दि.१०जून रोजी संध्याकाळी ६ वाजता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे आगामी 17 जून रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्ताने चंद्रपूर शहर हद्दीतील कुरेशी खाटीक व्यवसाय करणाऱ्यांची बैठक पार पडली ही बैठक शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी मंगेश भोंगाडे यांनी चंद्रपुरचे उप विभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या प्रमुख उपस्थीतीत घेतली. शहरातील मुस्लीम समाजातील कुरेशी (कसाई) बांधव यांची बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या वेळी शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश भोंगाडे यांनी सांगितले की
आगामी सण बकरी ईद ईद-उल-अझहा 17 मे 2024 रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी संदर्भात चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे ही बैठक घेण्यात आली असून हा सण साजरा करतांना कोणाच्याही भावना दुखणार नाही याची दखल घेण्यात यावी तसेच आपणास कोणाकडून ही त्रास दिला गेल्यास आमच्याशी संपर्क साधावा .कायदा हातात घेऊ नये या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केले.

चंद्रपुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव या बैठकीत प्रामुख्याने उपस्थितीत होते ते म्हणाले की १७/०६/२०२४ रोजी बकरी ईद (ईद-उल-अजहा) हा सण मुस्लीम बांधवातर्फे मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे तसेच तीन दिवस कुर्बानी कार्यक्रम ही  चालणार आहे सदर सणा दरम्यान कुर्बानी करीता गोहत्या, गोवंश अथवा गोमांस वाहतुक करणे यावर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी संवर्धन (सुधारीत) कायदा अन्वये दिनांक ०४/०३/ २०१५पासुन संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश करीता हा कायदा लागु केला आहे.
कुर्बानी काळात आपले कडुन कोणतेही प्रतिबंधीत जनावरे यांची कुर्बानी करण्यात येऊ नये, तसेच बकरी ईद करीता चंद्रपूर शहर महानगरपालिका कडुन तात्पुरते नेमुन दिलेल्या ठिकाणीच कुर्बानी करण्यात यावी तसेच गोवंश जनावराशिवाय म्हैस, रेडे, यांची कुर्बानी करण्यापुर्वी त्यांचे मांस मानवाने खाण्यायोग्य काहे काय? याबाबत जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त चंद्रपुर यांचे कडुन तपासणी करून घ्यावे.मांस किंवा रक्त इतरत्र किंवा रस्त्याने पडु नये याची ही दक्षता घ्यावी असे मार्गदर्शन सुधाकर जाधव यांनी या बैठकीत केले.

बैठकीला जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली,शहर शांतता समिती सदस्य सागर खोब्रागडे , दारुल उलुम मोहम्मदिया चे अध्यक्ष शेख मुश्ताक भाई , अशफाक हुसैन, अब्दुल वकील, सह खाटीक व्यवसाय करणारे अब्दुल रज्जाक कुरेशी,अक्रम कुरेशी, साबीर कुरेशी, जाकिर कुरेशी,शफाक कुरेशी,शेख कदिर कुरेशी,अनवर कुरेशी, जहीर कुरेशी, परवेझ कुरेशी, यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीत उपस्थित होते.