Home Breaking News Chandrapur dist@ news •अश्लिल शिवीगाळ करत केली विपूलला अमानुष मारहाण! •”त्या”ठाणेदारावर कडक...

Chandrapur dist@ news •अश्लिल शिवीगाळ करत केली विपूलला अमानुष मारहाण! •”त्या”ठाणेदारावर कडक कारवाई करण्याची कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षकांकडे केली जनतेंनी मागणी •ठाणेदार संदीप ऐकाडें विरुद्ध लेखी तक्रार दाखल !

212
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2,"square_fit":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Chandrapur dist@ news
•अश्लिल शिवीगाळ करत केली विपूलला अमानुष मारहाण!
•”त्या”ठाणेदारावर कडक कारवाई करण्याची कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षकांकडे केली जनतेंनी मागणी
•ठाणेदार संदीप ऐकाडें विरुद्ध लेखी तक्रार दाखल !

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

कोरपना (चंद्रपूर) चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील कोरपना तालुक्या अंतर्गत येत असलेल्या धानोली तांडा येथील विपुल देविदास मूनावत यांना कोरपनाचे ठाणेदार संदीप ऐकाडे यांनी दि. 8 जुन रोजी पोलिस स्टेशनला बोलावून बाजीराव पट्ट्याने अमानुष मारहाण केली.इतकेच नाही तर त्यास अश्लिल शिवीगाळ केली असल्याची बाब समोर आली आहे.दरम्यान या प्रकरणाच्या अनुषंगाने चंद्रपुरचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे कडे एका शिष्टमंडळाने लेखी तक्रार करुन ठाणेदार संदीप ऐकाडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीने सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबत आपली आपबिती सांगितल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष उत्तम नानाजी पेचे, दिग्गज नेते विजयराव बावणे, सीताराम कोडापे, संभाजी कोवे, अनंता गोडे, भाऊसिंग चव्हान, दीपक राठोड,नितीन राठोड यांच्या सह अन्य 30 महिला व पुरुष ठाणेदार संदीप ऐकाडे यांच्या विरोधात निवेदन देताना पोलिस अधिक्षक कार्यालयात जातीने उपस्थित होते.

या घटनेबाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि विपुल देविदास मुनावत, वय २८ वर्ष धंदा – मजुरी रा. तांडा नं. १ पो. धानोली तह. कोरपना हे दि. ०७.०६. २०२४ ला तांडा मुकामी हजर असताना संध्याकाळी अंदाजे ७ वाजता कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार एकाडे, एक ट्राॅफीक पोलीस शिपाई व एक महिला पोलीस घेवुन तांडा नंबर १ वर आले त्यावेळेस विपुल हा नेमका कोरपना येथुन बाजार करून आलेला होता. ठाणेदार यांनी विपुलचे काका रमेश सिंगटराव मुनावत रा. तांडा नंबर १ यांचे घरी दारू आहे म्हणून घर तपासण्यासाठी घरी गेले. घरी त्याची लहान बहीन घरात होती.तीने ठाणेदार यांना म्हटल की घरी कुणी नाही तेव्हा ठाणेदारांनी म्हटले तु सरकारी कामात अडथळा आणू नको . त्यानंतर ठाणेदार यांनी त्याच्या काकाचे घर तपासले तेथे त्यांना दारू सापडली नाही त्या नंतर त्यांनी तुझे घर कुठे आहे म्हणुन त्यास विचारले असता त्याने आपले ही घर त्यांना दाखविले. त्याच्याही घराची झडती घेतली
असता तेथेही त्यांना काहीच गवसले नाही .मग ठाणेदार यांनी सांगितले की तुझ्यावर मागील गुन्ह्याचा तपास बाकी आहे. तु उद्या दिनांक ०८.०६. २०२४ ला ठाण्यात ये नाहीतर बघ !असे त्यास ठणकावले.त्यानंतर तो दिनांक ०८.०६ २०२४ ला अंदाजे साडे दहा वाजता पोलीस स्टेशनला पोहचला पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेरच त्यांनी मोबाईल रेकार्डीग साठी सुरू करून आत नेला नंतर ठाणेदारांनी त्याला बोलावले. त्यांच्या सोबत मंचक देवकते मेजर हे ही सोबत होते .ठाणेदारानी मंचक देवकते याला प‌ट्टा घेवुन बोलाविले आणि मेजरला सांगीतले याला ५० प‌ट्टे मारा! त्या अगोदर त्यास ठाणेदार यांनी मनात येईल तशी अश्लील शिवीगाळ केली. नंतर मेजरच्या हातांनी त्याला अर्धा तास पट्‌या पट्‌यांनी सुज येतपर्यंत दोन्ही पायावर व हातावर मारले. मारतांना ठाणेदार एकाडे यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ केली . त्याला हाता पायाला सुज येत पर्यंत अमानुषपणे मारले . जेव्हा मारहाण केली त्यावेळची ऑडिओ क्लीप ही त्यांच्या कडे उपलब्ध आहे. नंतर तो तेथून दवाखान्यात जाण्यास निघाला असता त्यावेळेस ठाणेदार यांनी तु दवाखाण्यात गेला आणि मेडीकल केले तर पुन्हा मारतो म्हणून धमकी देवुन त्याला गावाला परत पाठविले. त्यानंतर गावातल्या लोकांनी त्याला दवाखान्यात आणून त्याचे मेडिकल केले,असून या प्रकरणात विपुल यास विनाकारण बेदम मारहाण करणाऱ्या ठाणेदार ऐकाडे यांचेवर पोलिस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करीत कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी विपुलसह कोरपना तालुक्यातील अनेकांनी प्रत्यक्ष भेटून केली .चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की घडलेल्या या प्रकारणाची चौकशी राजुराचे उपविभागीय पोलिस अधिकारी साखरे करत आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षक यांनी यावेळी दिले “चुकीला माफी नाही” हे ब्रिदवाक्य आता सार्थक ठरणार असल्याचे बोलल्या जात असून
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचे ब्रिदवाक्य असताना अश्या काही अधिकाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होणार नाही याची दखल चंद्रपूर पोलिस अधीक्षक‌ निश्चितच घेतील असा विश्वास जनतेत व्यक्त केला जात आहे हे मात्र तेव्हढेच खरे!
पोलिस अधीक्षक यांना दुपारी 12 वाजता तक्रार देण्यात आली व नंतर लगेच कोरपना पोलिस स्टेशन येथे राजुरा उपविभागीय अधिकारी साखरे हजर झाले .तीन वाजता तक्रारकरते विपुल यास घडलेल्या प्रकरणाबाबत विचारपूस ही केली.त्यामुळे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे दिलेले शब्द तंतोतंत पाळतात याची जाणीव त्या शिष्टमंडळाला झाल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्या कार्यशैलीचे तोंड भरून कौतुक केले आहे
महत्त्वाचे म्हणजे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करा असे फर्मान काढल्याने ठाणेदार ऐकाडे सारख्यांना पचनी पडत नसल्याने असे अधिकारी आपला हा राग निर्दोष लोकांवर काढत असेल तर अश्या अधिकाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे.
आता पुढे पाहू या प्रकरणात होणार तरी काय? स्वतः ला वाचविण्यासाठी ऐकाडे करणार कोणते उपाय? हा प्रश्न आज जरी अनुत्तरित असला तरी लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळेल! असे बुद्धिजीवी वर्गांकडून सर्वत्र बोलल्या जात आहे.