Home Breaking News Chandrapur dist@ news • बहुजन समता पर्व -प्रीपेड स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात...

Chandrapur dist@ news • बहुजन समता पर्व -प्रीपेड स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात चंद्रपूरात भव्य आंदोलन उभे करणार!

90

Chandrapur dist@ news
• बहुजन समता पर्व -प्रीपेड स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात चंद्रपूरात भव्य आंदोलन उभे करणार!

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातच नव्हे तर अख्या महाराष्ट्र राज्यात वीज ग्राहकांना प्रिप्रेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चंद्रपूर शहरात वीज ग्राहकांना प्रिप्रेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याकरीता सर्व्हे सुरू करण्यात करण्यात आला आहे.

वीज मीटर निवडीबाबत वीज कायदा २००३ कलम ५५ नुसार वीज ग्राहकांना वीज मीटर निवडीचे स्वातंत्र्य आहे.मात्र वीज वितरण कंपनी कडून स्मार्ट वीज मीटर लावण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी सर्व्हे करण्यात येत असून स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचे चित्र वीज वितरण कंपनी कडून निर्माण केले जात आहे.

मागील आठवड्यापासून शहरात आणि जिल्ह्यात प्रीपेड स्मार्ट वीज मीटर लावण्याच्या योजनेचा सर्व्हे वीज वितरण कंपनी कडून सुरू झाला आहे.मात्र प्रीपेड स्मार्ट वीज मीटरला वीज ग्राहकांकडून जोरदार विरोध होतो आहे.

विशेष म्हणजे प्रिपेड स्मार्ट वीज मीटरच्या संकल्पनेला राज्यातील वीज संघटनेचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे.चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश वर्ग हा आर्थिक दृष्टीने मागासलेला आहे.त्यामुळे स्मार्ट मीटर लावल्यास आधी पैसे भरून वीज वापरण्याची क्षमता ग्राहकांमध्ये मुळीच नाही.

वीज निर्मिती करणाऱ्या जिल्ह्याला निदान ३०० युनिट वीज मोफत देणे गरजेचे असतांना हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या माथी प्रीपेड स्मार्ट वीज मीटर लावण्याचे मनसुबे वीज वितरण कंपनी करीत आहे.रात्रोबेरात्रो रिचार्ज संपल्यास रिचार्ज वेळेत मारण्याची आर्थिक परिस्थिती नागरिकांची मुळीच नाही तसेच असंख्य नागरिकांना ऑन लाईन बिल सुद्धा पे करता येत नाही किंवा त्यांच्या कडे तशी सुविधाही उपलब्ध नाही.

अश्या परिस्थितीत प्रिपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी बहुजन समता पर्व चंद्रपूर शहरात घरा घरात जाऊन जनजागृती अभियान राबविणार असून प्रीपेड स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात लवकरच मोठ्या आंदोलनाचा प्रवित्रा घेणार असल्याचे बहुजन समता पर्वाचे डॉ.दिलीप कांबळे आणि डॉ.संजय घाटे म्हणाले.