Home Breaking News Bhadravti city@ news • शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख...

Bhadravti city@ news • शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे •भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न

45

Bhadravti city@ news
• शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे

•भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न

सुवर्ण भारत: मनोज मोडक
तालुका प्रतिनीधी, भद्रावती

भद्रावती : शिवसेनाप्रमुख वं. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला आहे. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे प्रत्येक शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभाग घेवून त्यांच्या समस्या व मागण्या समजावून घ्याव्या. त्या समस्या व मागण्या निकाली काढण्याचा सतत प्रयत्न करावा. या कार्यातून शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र) यांनी केले.
काल दि. १२ जुलै रोजी स्थानिक पक्ष कार्यालयात आयोजित (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भद्रावती शहर कार्यकारणीच्या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांचा विधानपरीषद निवडणूकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकित तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल व जेष्ठ शिवसैनिक तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे यांनी सुध्दा समयोचित मनोगत व्यक्त केले.
या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, जिल्हा युवासेना अधिकारी रोहण कुटेमाटे, जिल्हा युवासेना चिटणीस येशु आरगी, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर तसेच जेष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, शहर समन्वयक भुमेश वालदे, संघटक पंकज कातोरे, सहसंघटक साहेबराव घोरुडे, उपशहरप्रमुख अरुण घुगुल, विश्वास कोंगरे, संतोष माडेकर, उत्तम मजुमदार, विजय पारधे, प्रसिध्दीप्रमुख रवी कावळे, गोपाल सातपुते तथा विभाग प्रमुख अक्षय बंडावार, राजू बगडे, सतिश आत्राम, अभिजित बमनोटे, शंकर स्वान, शुभम पचारे, जय वरखडे, विशाल नारळे, निलेश आस्वले तसेच युवासेना शहर कार्यकारणीचे शहर अधिकारी मनोज पापडे, शहर चिटणीस समिर बल्की व माजी सैनिक सेलचे विजय तेलरांधे तथा इतर शहर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.