Home Breaking News Beed dist @news • माजी आमदार भीमराव धोंडे यांचा गहिनीनाथ गडाच्या...

Beed dist @news • माजी आमदार भीमराव धोंडे यांचा गहिनीनाथ गडाच्या दिंडीत पाच किलोमीटर अंतर ववारकऱ्यासोबत चालून सहभाग 

122

Beed dist @news

• माजी आमदार भीमराव धोंडे यांचा गहिनीनाथ गडाच्या दिंडीत पाच किलोमीटर अंतर ववारकऱ्यासोबत चालून सहभाग

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

विठ्ठल नामाचा गजर करीत गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होत आहे . करमाळा तालुक्यातील वरकुटे येथून आष्टी/ पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे शनिवारी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले , हातात टाळ, डोक्यावर टोपी परिधान करीत ५ किलोमीटर अंतर दिडींत वारकऱ्यासोबत चालत पाच तास दिंडीचा आनंद घेतला .
ओम चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज व प्रात स्मरणीय श्री संत वामनभाऊ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते श्री क्षेत्र पंढरपुरकडे ६ जुलै रोजी प्रस्थान झाले .
भगव्या पताका हातात घेऊन विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठा समजला जाणारा श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पायी दिंडी सोहळा वाहली, सावरगाव, वनवेवाडी , मातकुळी मैदान, जामखेड,सारोळा,खुरदैठण, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव उंडा, चिंचपुर, तांदळवाडी, देऊळगाव, मिरगव्हाण, सालसे, वरकुटे, भोगेवाडी,पिंपळखुंटे , अंबड,बार्डी, जाधववाडी , पवार वस्ती पाटा,मेंढापुर पाटील वाडा मार्गे पंढरपूर कडे जात आहे . दिंडीत प्रचंड संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. ३५० ते ४०० चारचाकी वाहनांचा ताफा दिंडी सोबत दिमतीला आहे .
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील गाव, वाडी, वस्त्यामधून हजारो वारकरी राष्ट्रसंत वामन भाऊंचे दिंडीत सहभागी झाले आहेत. संत वामन भाऊ महाराज यांनी या पालखीची सुरुवात सुमारे १३१ वर्षापूर्वी केली होती . आजही हि परंपरा सुरु आहे . बीड/अहमदनगर /संभाजीनगर व मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातील  वारकरी  सहभागी  होतात . शिस्तबद्ध आणि सर्व समावेशक असलेल्या दिंडीचे नियोजन या गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते . काही वृद्ध वारकरी चालुन थकल्यावर त्यांना बसण्यासाठी चारचाकी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच वारकरी आजारी पडल्यास त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची सोय देखील आहे . रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी महिला फुगडी तर पुरुषांनी कुस्ती व कबड्डी खेळत वारीचा आनंद घेतला . माजी आमदार भीमराव धोंडे हे जवळपास पाच तास गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री व वारकऱ्यांच्या सोबत होते . तसेच रिंगण सोहळ्याचा आनंद त्यांनी घेतला. पालखी सोहळ्याचे दर्शन घेत आठरे येथे झालेल्या अश्वांच्या रिंगण सोहळ्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वारकऱ्यांच्या सोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला . सोमवारी दिनांक १५ जुलै रोजी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने गहिनीनाथ गडाच्या दिंडीतील लाखो वारकऱ्यांसाठी महापंगत देणार असून , महापंगतीच्या प्रसादाचा वारकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे .