Home Breaking News Varora city @news • कारची दुचाकीला जबर धडक •एकाच कुटुंबातील वडील, आणि...

Varora city @news • कारची दुचाकीला जबर धडक •एकाच कुटुंबातील वडील, आणि दोन मुले असें तीन गंभीर जखमी •दोघांची प्रकुर्ती गंभीर

79
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":2,"transform":2,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Varora city @news
• कारची दुचाकीला जबर धडक
•एकाच कुटुंबातील वडील, आणि दोन मुले असें तीन गंभीर जखमी
•दोघांची प्रकुर्ती गंभीर

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा: येथील रेल्वे क्रासिंगवरील उड्डाणपुलावरून मार्केट मधून काही वस्तू घेऊन विजय देवगडे आपल्या दोन मुलासह एम एच 34 बी एम 6468 क्रमांकाच्या दुचाकीने मजरा (पारधी टोला) आपल्या स्वगावी जाण्यासाठी निघाले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच o3ए आर 5284 क्रमांकाच्या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वारचा मुलगा उड्डाणं पुलाच्या खाली पडला. त्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांमधून दोघांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे कळते. सदर घटना 13 जुलै 2024 ला संध्याकाळी 8.15 चे सुमारास घडली. गंभीर जखमीचे नावे अभिषेख देवगडे, वय 7 वर्ष, अजय देवगडे वय 8वर्ष, विजय देवगडे वय 40 वर्ष रा. मजरा (पारधी टोला )ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर असें आहे.जखमीवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे प्राथमिक उपचार केला परंतु प्रकुर्ती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. वरोरा उड्डाणं पुलावरून कार ही भरधाव वेगाने वरोरा शहराचे दिशेने जात असताना कारचा टायर फुटला आणि दुचाकीला धडक बसली,असें कार चालकाचे म्हणणे आहे. परंतु कारचा वेग कमी असता तर धडक बसली नसती आणि दुचाकीवर स्वार असलेले तिघेही गंभीर जखमी झाले नसते असें बोलल्या जात आहे.सदर अपघाती कार चालक चंद्रकांत सीमा कळसकर वय 27 वर्ष असें नाव आहे. वरोरा पोलिसात तक्रार झाली असून चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

“भरधाव वेगाने वाहने चालवीणाऱ्यांवर पोलिसांचे नियंत्रण नाही”

शहरातून तसेच चंद्रपूर -नागपूर महामार्गवरून भरधाव वेगाने वाहने चालतात. तसेच उड्डाणं पुलावरून वरोरा शहरात जाणारी वाहने सुद्धा भरधाव वेगाने जातं असतात. याकडे रस्ते वाहतूक नियंत्रकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येतात.भरधाव वेगाने वाहने चालवीणाऱ्या चालकांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे”.