Home Breaking News Varora taluka@ News •पुनर्वसन गावातील विविध समस्येचे निवारण करून नागरिकांना सुविधा देण्यात...

Varora taluka@ News •पुनर्वसन गावातील विविध समस्येचे निवारण करून नागरिकांना सुविधा देण्यात याव अन्यथा आंदोलन चा इशारा:छोटू भाई शेख

21

Varora taluka@ News
•पुनर्वसन गावातील विविध समस्येचे निवारण करून नागरिकांना सुविधा देण्यात याव
अन्यथा आंदोलन चा इशारा:छोटू भाई शेख

सुवर्ण भारत :खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा: शासन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शासकीय योजना व ग्रामपंचायत मतदान-पासून 400 आदिवासी नागरिक 5 वर्षापासून वंचित

जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोन भद्रावती तालुका जिल्हा चंद्रपूर येथील पळसगावचे पुनर्वसन वरोरा तालुक्यातील सालोरी बीटा मधील कक्ष क्रमांक 11 मध्ये सण 2019.ला स्थलांतरण करण्यात आले असून 5.वर्ष लोटून सुद्धा पळसगाव ला ग्रामपंचायत मान्यता देण्यात आली नाही या चुकीमुळे शासनाच्या लाभदायक सर्व योजना व ग्रामपंचायत कामापासून 90 आदिवासी कुटुंब 400 नागरिक वंचित झाले आहे तसेच गावातील शेती व बोरवेल करिता विज इलेक्ट्रिक लाईन/गावातील अंतर्गत विविध कामासाठी सुद्धा पुनर्वसन लाभार्थी वंचित राहिले आहे तसेच भूधारक यांना शेती ७/१२ ऑनलाइन रेकॉर्ड झाले नाही यावरून स्पष्ट होत आहे की महाराष्ट्र शासन प्रशासन पुनर्वसित गावाकडे दुर्लक्ष करीत आहे पुनर्वसन गावाच्या समस्या पुढील प्रमाणे १) गाव पुनर्वसनास ५ वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाली नाही.२) शेतकऱ्यांचे ७/१२ ऑनलाइन झाले नाही त्यामुळे शासनाच्या विविध योजनेपासून शेतकरी वंचित आहे.३) गावातील सांडपाणी वाहून येण्यासाठी नाली बांधकाम ( गटारी) व परस रोड (सिमेंट) बनविले नाही.४) सिंचनासाठी बोरवेल ला मीटर व विज कनेक्शन दिले नाही.५) शेत शिवारातील पांदन रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे.६) वरोरा तालुक्यात गाव समाविष्ट करण्यात यावे.७) गाव लगतचे वनली व खातोडा हे दोन गाव जोडून ग्रामपंचायत ची स्थापना करावी ८) पळसगाव ते वनली २कि.मी डांबरीकरण रस्ता तयार करण्यात यावा ९) गावातील श्री मोहन गोविंदा मडावी यांचे कुटुंबातील लाभार्थ्यांना पुनर्वसन पॅकेज देण्यात यावे.१०) पुनर्वसनाकरिता १८ वर्षावरील नोटिफिकेशन ( cut off birth date) एप्रिल २०१४ जीआर नुसार असून गावाचे पुनर्वसन २०१९ मध्ये झाले असल्यामुळे जे मुले मुली ३ ते ४ महिन्यांनी पुनर्वसन पॅकेज मध्ये अपात्र ठरले आहे त्यांना पुनर्वसन कालावधीत वय २२ ते २३ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्यात यावा ११) शौचालय व गॅस ओटा रक्कम देण्यात यावी.१२) हनुमान मंदिर ते पाण्याची टाकी पर्यंत रस्ता तयार करून द्यावा.१३) स्मशानभूमी गुरासाठी आखर गोवाडी ढोरफोडी खेळाचे मैदान मुलांसाठी उद्याने याकरिता जागेची निश्चित करून ७/१२ वर नमूद करण्यात यावे.१४) घराच्या जागेचा (मालमत्ता) अपात्र व्यक्तीला मोबदला देण्यात यावा १५) कुटुंबातील एका व्यक्तीस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे १६) गावातील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निवारण करण्याकरिता संबंधित सर्व अधिकाऱ्यांची सामूहिक सभा पडसगाव येथे गावकऱ्यांच्या उपस्थित घेण्यात यावी वरील समस्यांचे सात दिवसांच्या आत निवारण करून गावातील सर्व आदिवासी नागरिकांना न्याय अधिकार व शासनाच्या सर्व योजनेच्या लाभ देण्याची कार्यवाही करून लेखी स्वरूपात आम्हाला कळवण्यात यावे अन्यथा आठव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर किंवा उपविभागीय कार्यालय वरोरा येथे सर्व गावकरी यांना सोबत घेऊन धडक मोर्चा आंदोलन करण्यात येईल निदेवन ना.सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री तथा वनमंत्री म.रा. मुंबई.ना.विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते, खा.प्रतिभा धानोरकर, पुनर्वसन मंत्री, व जिल्हाधिकारी चंद्रपूर मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. चंद्रपूर मुख्य वनरक्षक कथा क्षेत्र संचालन TATR चंद्रपूर उपसंचालक TATR चंद्रपूर,अधीक्षक अभियंता महावितरण चंद्रपूर निवेदनाची प्रत पाठवण्यात आली
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वरोरा यांच्यासोबत चर्चा करून नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले

यावेळी शेख जैरुदीन छोटूभाई माजी सभापती वरोरा तथा प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कामगार कर्मचारी वि मा रा मुंबई, सुनील जयराम कुमरे, तुळशीदास रामदास कनाके, मोहन गिविंदा मडावी, अर्जुन धुर्वे, मंगेश पेंदाम,रेखा जांभुळे, सरस्वती कुमरे , शामकला शेडमाके, जयंत कुळमेथे, निलेश कुळमेथे, भाऊजी परचाके, रामकृष्ण मंगाम, रमेश मसराम, हनुमान कोवे, दीपक गाऊत्रे

जैरु सदर मागण्या लवकर मार्गी लावण्याकरिता बैठक बोलवण्यात येईल असे अधिकारी यांनी सांगितले सात दिवसाच्या सदर मागण्या मान्य करून समस्येचे निवारण न झाल्यास गावकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती निवेदन करता छोटुभाई शेख यांनी दिले