Home Breaking News Beed dist @news •पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत लवकरात लवकर निर्णय...

Beed dist @news •पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही तर — ? •९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा— सौ वैशाली राणे /भारती साळवी

24

Beed dist @news

•पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही तर — ?

•९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा— सौ वैशाली राणे /भारती साळवी

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी सन १९९९ —- २०२४ या कालावधीत अंशकालीन कर्मचारी गेल्या २५ वर्षापासून लढा देत असून , या लढ्याला महाराष्ट्रातील २५ वर्षा च्या कालावधीत कोणत्याच सरकारने आजपर्यंत न्याय दिला नाही? आसे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा भारती साळवे , उपाध्यक्ष वैशाली राणे यांनी सांगितले आहे .
पुढे पत्रकात सांगितले की , पदवीधर अंशकालीन या संघटनेचे महाराष्ट्रातील अनेक अध्यक्ष होऊन गेले असुन , या अध्यक्षाच्या मनमानी कारभार– दादा यांना सतत पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी आपल्या नोकरीच्या माध्यमातून अनेक आजाद मैदानावर आंदोलन करून सुद्धा , अद्याप सरकारने याची दखल घेतलेली नाही ? महाराष्ट्रातील अध्यक्षांनी नोकरीच्या नावाखाली अनेक महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून पैशाची लूट केलेली असून , पदवीधर अंशकालीन कर्मचारी नसतानाही तमाम महाराष्ट्रातील या अध्यक्षांनी लुटमार केली .
तसेच महाराष्ट्रात युती सरकार असताना १९९६ ते १९९९ पर्यंत सेवा योजना कार्याला कडून महाराष्ट्रातील पदवीधरांना ३०० रुपये मानधनावर पार्ट टाइम काम करण्याची संधी उपलब्ध करून त्यांना रोजगाराची निर्मिती केली होती , महाराष्ट्रात एकूण चार हजार दोनशेच्या अधिक पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून कार्यरत होते . पदवीधर अंशकालीन कर्मचारी महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून हनीफ भाई जरीवाल ,मंदा साळवी यांनी काम पाहिले . तेव्हा महाराष्ट्रात सेवा योजना कार्यालयाकडे नोंद केलेली चार हजार दोनशे एकोणीस पदवीधर अंशकालीन कर्मचारी होते . तर महाराष्ट्रात विविध अध्यक्ष होऊन यांनी वेगवेगळ्या संघटना स्थापन करुन, त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक डुबलीकेट दाखले काढून महाराष्ट्रात एकूण १८००० हजार च्या वरती पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या नोंदी झाल्या असून , या सर्व नोंदी रीतसर आहेत की नाही ? याची राज्य सरकारने तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी .
तसेच महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना २०१९ नंतर महाराष्ट्रातील पदवीधर योजना बंद करण्यात आली असून , सेवा योजना कार्यालयाकडून २००० नंतर कोणतेही पदवीधर यांना कोणत्याही प्रकारचा पार्ट टाइम जॉब दिला नाही , ही योजना राज्य सरकारने बंद करून २००० नंतर कोणताही पदवीधर अंशकालीन महाराष्ट्रात निर्माण झालेला नसून , २००० नंतर जे पदवीधर अंशकालीन निर्माण झालेले आहेत त्यांची दाखले डुबलीकेट असून , याची चौकशी करावी . वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून त्यांनी आपली डुबलीकेट दाखले गोळा केलेली असून , या दाखल्याच्या आधारावर काही डुबलीकेट पदवीधर नोकरीला लागून त्यांनी सरकारची मोठी फसवणूक केली असून , याची सरकारने शहानिशा करून यांच्यावर कठोरात –कठोर कारवाई करावी , अशी विनंतीही करण्यात आली आहे .
तसेच पुढे सांगितले की , महाराष्ट्रातील चार हजार दोनशे एकोणीस च्या पुढील उमेदवार या नोकरीपासून वंचित असून , यातील बरेचसे पदवीधर मरण पावलेले असून , याचा सर्वे करून उर्वरित पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सरकारने तात्काळ न्याय द्यावा ही नम्र विनंती असून , महाराष्ट्र सरकारने या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून पदवीधर अंशकालीन यांना न्याय द्यावा असे ही सांगितले .
तसेच महाराष्ट्रात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जात असून , सरकारने कोण कोणते अध्यक्ष आहेत याचा बारकाईने अभ्यास करून यांच्यावर कठोर कारवाई करावी , खऱ्या पदवीधर अंशकालीन नोकरी पासून बाहेर आहेत , त्यांची सेवा योजना कार्यालय मध्ये नोंदी आहेत , या नोंदीचा अभ्यास करून आपण भरून घेतलेले २००१ पर्यंतचे सर्व नोटि सरकारकडे जमा असून , त्यांनी त्याची चौकशी करावी . जे पदवीधर नोकरी पासून खरे वंचित आहेत यांची जर दखल नाही घेतली तर , सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आगामी काळात विधानपरिषदेच्या वातावर परिवर्तन करतील , व विरोध- विरोधी बाकावर असणाऱ्या पक्षांना मदत करतील याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी नम्र विनंती केली .
९ ऑगस्ट २०२४ ला आझाद मैदानावर बसणाऱ्या सौ वैशाली राणे / भारती साळवी यांना योग्य प्रकारचा न्याय द्यावा . व हे न झाल्यास येणाऱ्या विधानसभेला त्याच प्रत्युत्तर देण्यात येईल ही सरकारने नोंद घ्यावी ,असे हि सागितले असून,
महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा हा शेवटचा इशारा असून , सरकारने याची जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर ?, सर्व कर्मचारी महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आत्महत्या करणार ?आणी त्यांच्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येईल! महाराष्ट्रातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन काम करतील याची नोंद घेण्याचे आवाहन केले ,असून
पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटने मार्फत मा. मुख्यमंत्री , मा उपमुख्यमंत्री , मा. कौशल्य विकास मंत्री , मा सौ सुजाता सैनिक मॅडम याना अंशकालीन कर्मचारी यांच्या मागण्या बाबत निवेदन देण्यात आले असून , मागण्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही तर ? ९ ऑगस्ट २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येईल , असा इशारा दिला असून , या सर्वानी आंदोलन करण्याच्या तयारी मध्ये राहावे , महाराष्ट्र मधील सर्व जिल्हे /तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी सर्वाना सूचना द्याव्यात , मुख्यमंत्री आपले सरकार म्हणून सर्वाना न्याय देत असतिल तर! आम्हाला का नाही देणार ? अभि नही तो कभी नही ? महाराष्ट्र मधील सर्व अंशकालीन बांधवांना काही ना काही न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे , तरी सर्व नेत्यांनी /बांधवांनी याची दखल घ्यावीआसे आवाहन सौ वैशाली राणे /भारती साळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे .