Home Breaking News Ballarpur city @News • नगरपरिषद शाळांच्या प्रश्नावर आम आदमी पक्ष पुन्हा...

Ballarpur city @News • नगरपरिषद शाळांच्या प्रश्नावर आम आदमी पक्ष पुन्हा मैदानात

123

Ballarpur city @News

• नगरपरिषद शाळांच्या प्रश्नावर आम आदमी पक्ष पुन्हा मैदानात

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:मागील दोन वर्षांपासून नगरपरिषद शाळांच्या प्रश्नावर आम आदमी पक्ष सतत आक्रमक भुमिका घेत. शहरातील नगरपरिषद शाळांची स्थिती सुधारावी यासाठी पक्षाचे सतत प्रयत्न सुरू आहेत.

मागील सत्रात आप तर्फे शालेय साहित्याचा पुरवठ्याबाबत मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्याकडे प्रश्न केल्यावर “तुम्ही निवेदन दिले नसते तरीही आम्ही विद्यार्थ्यांना सर्व साहित्य दिले असते .विद्यार्थ्यांना केव्हा काय द्यायचे हे आम्हाला माहित आहे.” असा प्रत्युत्तर दिला होता या सत्रात शाळा सुरू होऊन जवळपास २३दिवस  लोटले असतांना अजूनही विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप झालेले नाही. हेच मुख्याधिकाऱ्यांचा जबाबदारपणा आहे का? मागील सत्रात बोललेले शब्द मुख्याधिकाऱ्यांना आठवत नाही का? शिक्षण सारख्या विषयाकडे वारंवार दुर्लक्ष का?असा प्रश्न आपचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी उपस्थित केला व त्वरित विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करा, शाळांमधील शिक्षकांची संख्या वाढविण्यात यावी व नगरपरिषद शाळांअंतर्गत येणाऱ्या पुर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेतील पटसंख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करावे, या मागणीकरिता आप शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन दिले.

या निवेदनात 2023-24 या सत्रात नगरपरिषदे तर्फे शिक्षण व्यवस्था व पायाभूत सुविधा सुधारणा करिता कोणते प्रयत्न केले याची माहिती मागण्यात आली तसेच नगरपरिषदेच्या सर्व शाळांना भेट देऊन शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेण्याची अनुमती मुख्याधिकाऱ्यांना मागण्यात आली. जर या आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप झाले नाही तर पालक तसेच आम आदमी पक्ष तीव्र आंदोलन करेल व या आंदोलनास मुख्याधिकारी व शिक्षणाधिकारी जबाबदार राहतील असा इशारा रविकुमार पुप्पलवार यांनी दिले. यावेळेस उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, स्मिताताई लोहकरे, रेखाताई भोगे, सतिश श्रीवास्तव, मनिषाताई अकोले , प्रिती जगताप इत्यादि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.