Home Breaking News Wardha Dist @News • समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा आयोजित वर्षावास...

Wardha Dist @News • समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 टिटवाळा पूर्व येथे

104

Wardha Dist @News
• समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 टिटवाळा पूर्व येथे

सुवर्ण भारत:अर्पित वाहने

वर्धा उपजिल्हा प्रतिनीधी

टिटवाळा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी समता सैनिक दल मुंबई विभाग द्वारा वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 चे उद्घाटकीय पहिले पुष दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता, धम्मदीप बुद्ध विहार, रविंद्र रेजेन्सी, समता सैनिक दल विभागीय कार्यालय, टिटवाळा पूर्व येथे गुंफण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक मार्शल हिवराज टेंभुर्णे राहिले त्यांनी स्मृती. मार्शल नामदेव कदम (बाबा) यांच्या स्मृतींना उजाळा दिला तसेच या पहिल्या पुष्पाचे प्रवचनकर्ते महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अनिकेत उबाळे यांनी उपस्थितांना वर्षावास आणि दान सम्राट अनाथपिंडक यावर मार्गदर्शन केले. पौर्णिमेचे महत्त्व पटवून देत असताना त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या विज्ञानवादी धम्माची आवश्यकता प्रतिपादन केली.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मार्शल सुरेश जाधव , मार्शल आधार मकासरे (जळगाव), सुरेश मुळीक सर (कार्यकारी संपादक, भारतीय जनता मासिक), मार्शल नितीन सोष्टे, महिला विंगच्या मार्शल आशा जाधव, ठाणे जिल्हा निमंत्रक मार्शल सुषमा उबाळे, मार्शल मीनाक्षी कदम, धनवे मॅडम उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन आद. मार्शल रत्नप्रभा कदम यांनी केले.