Gadchiroli dist@ news
•जिल्ह्यातील प्रशासन सतर्क राहावे
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश
• अतिवृष्टीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
सुवर्ण भारत शंकर महाकाली (संपादक)
अहेरी: जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस असल्याने गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे आणि हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था सतर्क राहावे आणि सर्वोतोपरी मदत करावे अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी केल्याचे माहिती दिली आहे.
पूर परिस्थिती असल्याने पूर्वनियोजित म्हणून नागरिकांना अन्नधान्य, औषधी, दैनंदिन साहित्य सामुग्री उपलब्ध करून ठेवावे, प्रसंगी राहण्यासाठी निवासस्थाने व ठिकाण उपलब्ध करून ठेवावीत जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था ठेवावी अशाही सूचना मंत्री ना धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रशासनाला दिले आहे.
आणि प्रामुख्याने गडचिरोली जिल्हा ऑरेंज अलर्ट केल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी, रस्ता व पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही दुचाकी, चारचाकी वाहने चालवू नये, नदीकाठावरील नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्कता बाळगून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी शेतातील कामे व विजेशी सबंधित कामे काळजीपूर्वक करावे, पाणी उकळून प्यावे, थंड अन्न खाऊ नये सर्वांनी सतर्क राहण्याचे व दक्षता बाळगण्याचे आवाहन ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले असून योग्य ती खबरदारी व सतर्क राहण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्याची माहिती मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली असून नागरिकांनी सुध्दा सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
