Home Breaking News Ballarpur city@ News • अभ्यासक्रमात पवन भगत यांचे ‘ ते पन्नास दिवस...

Ballarpur city@ News • अभ्यासक्रमात पवन भगत यांचे ‘ ते पन्नास दिवस ‘ कादंबरी समाविष्ट केले

52

Ballarpur city@ News
• अभ्यासक्रमात पवन भगत यांचे ‘ ते पन्नास दिवस ‘ कादंबरी समाविष्ट केले

सुवर्ण भारत:शंकर महाकाली ( संपादक)

बल्लारपूर : – लेखक पवन भगत यांचे ‘ ते पन्नास दिवस ‘ कादंबरी अहमदनगर येथील स्वायत्त मराठी विषयातील पदवी वर्गासाठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून समाविष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये व ज्ञानप्राप्ती होणे तसेच विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी भारतातील लोकसंख्येला गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण शिक्षण व संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू केलेले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय शिक्षणप्रणालीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणताना, विद्यार्थी केंद्री, आंतर्विद्याशाखीय, रोजगाराभिमुख, कौशल्याधिष्ठीत असे भाषा व साहित्याचे अभ्यासक्रम निर्माण करणे गरजेचे आहे.
साहित्यिक क्षमता, भाषिक क्षमता वाढीसाठी, जीवनाच्या आकलनासाठी आणि प्रगल्भतेसाठी विद्यार्थी सिद्ध करणे; ही आजची गरज बनली आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मराठी विषयातील पदवी वर्गासाठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून आपल्या ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीला मान्यतेनुसार समावेश करण्यात आला आहे. लेखनातून विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या कादंबरीच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागेल असे एका पत्राद्वारे पवन भगत यांना कळविले आहे.