Home Breaking News Beed dist @news • स्वारातीचे अधिष्ठाता यांच्या लेखी अहवालानंतर अभिजीत लोमटे...

Beed dist @news • स्वारातीचे अधिष्ठाता यांच्या लेखी अहवालानंतर अभिजीत लोमटे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित— • सर्व मागण्या लेखी मान्य– • मात्र हे प्रत्यक्षात बंद न झाल्यास पुन्हा उपोषण:अभिजीत लोमटे

60

Beed dist @news

• स्वारातीचे अधिष्ठाता यांच्या लेखी अहवालानंतर अभिजीत लोमटे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित—

• सर्व मागण्या लेखी मान्य–

• मात्र हे प्रत्यक्षात बंद न झाल्यास पुन्हा उपोषण:अभिजीत लोमटे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारा विरुद्ध तसेच सर्वसामान्य रुग्णाच्या विविध समस्या संदर्भात अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई चे अध्यक्ष अभिजीत लोमटे सोमवारी आमरण उपोषणास बसले होते . या उपोषणाची गंभीर दखल स्वा रा ती प्रशासनाने घेत सर्व मागण्या मान्य केल्याने अभिजीत लोमटे यांच्या उपोषणास मोठे यश मिळाले असून , अमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले .

सर्वसामाण्याच्या प्रश्नावर डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे हे आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या या मागण्या रास्त असून आम्ही त्यांच्या सोबत असून मागण्या मान्य न झाल्यास विविध पक्ष संघटना स्वा रा ती वर मोर्चा काढण्याचा इशारा , पाठिंबा देणाऱ्या पदाधिकारी यांनी दिला . दिवसभरात काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष असेफोदीन खातीब, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष ऍड शिवाजी कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे, रणजीत चाचा लोमटे,अजित गरड,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे,शहराध्यक्ष गोविंद मस्के, शिवसेना उबाठा विधानसभा प्रमुख मदनलाल परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार)जिल्हा कार्याध्यक्ष संजीवनीताई देशमुख, शहराध्यक्ष सी ए देशमुख ताई, जिल्हा प्रवक्ता अँड इस्माईल गवळी, महाराष्ट्र विकास पार्टीचे तालुका अध्यक्ष ताहेर चाऊस, शहरातील पत्रकार बांधव तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी यांनी उपोषण स्थळी येत पाठिंबा दिला , तर मनसे उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप,लोकजणशक्ती पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष राजेश वाहूळे यांच्या सह आदींनी पाठिंबा दिला .

दरम्यान अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत स्वाराती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे, डॉ राकेश जाधव, डॉ बिराजदार, डॉ मोगरिकर या शिष्टमंडळाने उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्ते अभिजीत लोमटे यांना लेखी अहवाल देत सर्व मागण्या मान्य करत कारवाई केल्याचे लेखी पत्र दिल्याने अभिजीत लोमटे यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र परिपत्रक जरी काढले तरी डॉक्टर जर खाजगी प्रॅक्टिस करत असतील तर , आगामी काळात पुन्हा अमरण उपोषण करणार असल्याचे प्रतिनिधीशी बोलताना या प्रसंगी सांगितले .