Home Breaking News Rajura City@ News •राजुरा शहरात गोळीबार एकाची हत्या •चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनावर...

Rajura City@ News •राजुरा शहरात गोळीबार एकाची हत्या •चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

402

Rajura City@ News
•राजुरा शहरात गोळीबार एकाची हत्या
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

राजुरा: (२३जुलै) जिल्ह्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. राजुरा शहरात पंचायत समिती जवळील बँक ऑफ महाराष्ट्र समोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजुरा येथे गोळीबार करून एका राजुरा शहरातील रहिवासी शिवज्योतसिंग देवल असे मृताचे नाव असून तो हत्या झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिनांक २३/०७/२०२४ सायंकाळी सात वाजता च्या सुमारास दुचाकी वरून आलेल्या दोन युवकांनी तोंडाला मास्क लावून खून केल्याने राजुरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस विभाग घटनास्थळी दाखल! ही हत्या नेमकी कशामुळे झाली आणि खुनी कोण आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी राजधानीत सातत्याने वाढ होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.