Home Breaking News Beed dist @news •अजयदादा काशिद यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट...

Beed dist @news •अजयदादा काशिद यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट !

107

Beed dist @news

• अजयदादा काशिद यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट !

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

जामखेड तालुका भाजपाचे अध्यक्ष व युवा नेते सारोळा गांवचे सरपंच अजयदादा काशिद यांनी माध्यामिक शिक्षणाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट दिली . यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी त्यांचे कार्यालयात स्वागत केले .
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाचे काम चांगले चालले असून एकंदर कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले .यावेळी बोलतांना उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की , अजयदादा यांना शिक्षणाविषयी अतिषय आस्था असून जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते नेहेमी प्रयत्न करीत असतात .
जिल्हा परिषद शाळा सारोळा या शाळेच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे . त्यांनी केलेल्या कामामुळेच शाळेला मुंख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात सारोळा शाळेने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला .राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर स्कॉलरशिप परीक्षेत मुले गुणवत्ता यादीत चमकले आहेत .
यावेळी महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब सघटनेचे राज्याचे अध्यक्ष पवळे साहेब यांच्या हस्ते नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी अधिक्षक धोदाड,कक्ष अधिकारी नवले व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते .