Home Breaking News Chandrapur dist@ News •अनिल डोंगरे यांचा नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहा तर्फे सन्मानित.

Chandrapur dist@ News •अनिल डोंगरे यांचा नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहा तर्फे सन्मानित.

53

Chandrapur dist@ News
•अनिल डोंगरे यांचा नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहा तर्फे सन्मानित.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली(संपादक)

चंद्रपूर:नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकहितार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा कार्यक्रम राधे कृष्ण सेलिब्रेशन हॉल चंद्रपूर येथील आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष,उद्घाटक ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री व वणे,सांस्कृतिक कार्य व चंद्रपुर व जिल्हा पालकमंत्री हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून आ.सुधाकर अडबायले, अरविंद कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर वीरेंद्र सिंह व इतर मान्यवर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या सन्मान सोहळा कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३१ व्यक्तींना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले.यामधील अनिल डोंगरे यांच्या दारू व्यसनमुक्तीच्यां कार्याबद्दल त्यांना ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते तसेच मंचावर मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

अनिल डोंगरे यांनी प.पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना यांच्या माध्यमातून २००९ मधील पांढरकवडा तालुका चंद्रपूर येथील दारू व्यसनमुक्ती मेळाव्याच्या माध्यमातून या कार्याची सुरुवात केली. ना.सुधीर मुनगंटीवार यांचा या संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची पहिलीच वेळ होती. ना.सुधीर मुनगंटीवार नेहमी या संघटनेच्या मोठमोठ्या मेळाव्याच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवून त्यांनी आपल्या राजकीय,सामाजिक कार्यामधील दारू व्यसनमुक्तीचा महत्त्वाचा विषय म्हणून समोर ठेवला. अनिल डोंगरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमास सहभाग नोंदवून चंद्रपूर जिल्ह्यातील समाज दारू व्यसनाच्या आहारी जात असून तो कुठेतरी भटकत चाललाय त्या समाजाला व्यसनमुक्त करून एका मुख्य मार्गावर आणण्याचा त्यांनी या कार्याच्या माध्यमातून संकल्प घेतला. स्वतः समोर होऊन मोठ मोठे मेळावे घेण्यात आले.
2015-16 मधील अनिल डोंगरे यांची संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली.त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेकडो छोटे-मोठे जनजागृती पर मेळावे कार्यक्रम लावून दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना दारू व्यसनमुक्त करून त्यांच्या जीवनात सुख समाधान आनंद आणण्याचे काम केले जात आहे. आजच्या दिवसापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात लाखो लोक दारू व्यसनमुक्त झाली आहे. असे म्हटले तर वावग ठरणार नाही जेवढे चंद्रपूर जिल्ह्यात लोकांमधील दारू व्यसनाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे आहे. त्याचप्रमाणे या संघटनेच्या माध्यमातून लोकांना दारू व्यसनमुक्त केले जात आहे. हे विशेष
अनिल डोंगरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१७-१८ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच विविध सेवाभावी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा सत्कार केला जात आहे.