Gadchiroli dist@News
Aheri @ना.अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे छत्र्या वाटप!
सुवर्ण भारत शंकर महाकाली (संपादक)
अहेरी:- पावसाळा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (अजित पवार गट)तर्फे पावसापासून बचाव व्हावे यासाठी अहेरी व देवलमरी येथे गरीबांना छत्री वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली व अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे 22 जुलै वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहेरी तालुका तर्फे अहेरी बाजार वाडीतील भाजीविक्रते तसेच अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे छत्री वाटप करण्यात आले.
छत्री वाटप कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, देवलमरी ग्राम पंचायतीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके, व्यंकटराव पेठा ग्राम पंचायतीचे उपसरपंच किशोर करमे, पितांबर कुळमेथे, सांबय्या करपेत, बाबुराव तोरेम, संतोष येमुलवार, विक्रम आत्राम, राज मडावी, भास्कर आत्राम, चित्तरंजन पुलगम, मधुकर पानेम, सुरेश गुंडावार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामील होते.
