Home Breaking News Varora City @News • वरोरा येथे ‘ कारगिल ‘ च्या विजयाचा रौप्यमहोत्सवी...

Varora City @News • वरोरा येथे ‘ कारगिल ‘ च्या विजयाचा रौप्यमहोत्सवी सोहळा आयोजित • संस्था, संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

129

Varora City @News
• वरोरा येथे ‘ कारगिल ‘ च्या विजयाचा रौप्यमहोत्सवी सोहळा आयोजित

• संस्था, संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ कारगिल’ युद्धात वीरगती पत्करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या हुतात्मांना आदरांजली म्हणून शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संस्था, चंद्रपूर, वरोरा येथील माजी सैनिक संघ, एअर बार्न ट्रेनिंग सेंटर, स्व. मोरेश्वर टेमुर्डे चॅरिटेबल ट्रस्ट, पैगाम साहित्य मंच, बेस्ट सेक्युरिटी एजन्सी च्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजता शहीद स्मारक येथे ‘ कारगिल ‘ विजयाचा रजत महोत्सवी सोहळा साजरा होत आहे. विजय दिनाचा जल्लोष साजरा करण्यासाठी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरुवातीला सकाळी ८.०० वाजता शहीद स्मारकापासून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. तदनंतर शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरोरा उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, ( भापोसे), वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ६.३० वाजता वरोरा येथील शगुन मंगल कार्यालयात सैनिक व मान्यवराचा सन्मान सोहळा आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त ऑननरी कॅप्टन वामनराव निब्रड, विलास दवने,अरुण कामेलकर, डॉ खुटेमाटे इ.दींची उपस्थिती राहील. या कार्यक्रमात सुजाण व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सुरेश बोभाटे , सागर कोहळे, वामन राजूरकर, अमन टेमुर्डे, अनिल चौधरी, ऋषी मडावी, अशोक वर्मा, माजी सैनिक आदींनी केले आहे.