Home Breaking News Mul taluka @news •अधिवक्ता हिमाणी वाकुडकर यांची राष्ट्रीय लोकहित सेवाच्या मूल...

Mul taluka @news •अधिवक्ता हिमाणी वाकुडकर यांची राष्ट्रीय लोकहित सेवाच्या मूल तालूका महिला ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती ; अनेकांनी केले वाकुडकरांच्या नियुक्तींचे स्वागत!

46

Mul taluka @news

•अधिवक्ता हिमाणी वाकुडकर यांची राष्ट्रीय लोकहित सेवाच्या मूल तालूका महिला ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती ; अनेकांनी केले वाकुडकरांच्या नियुक्तींचे स्वागत!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

मूल :तालुक्यातील नांदगाव या गांवच्या मुळ रहिवाशी असलेल्या उच्च शिक्षित अधिवक्ता हिमानी दशरथ वाकुडकर यांची तालूका महिला ग्रामीण अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.त्याच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय लोकहित सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी त्यांचे कडे सुपूर्द केले. त्या नांदगाव येथील ग्राम पंचायत सरपंच पदाची धूरा गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीरित्या सांभाळत आहेत . सामाजिक कार्याची त्यांना अमाप आवड असून आज पर्यंत त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोलाचे राहिले आहे.या शिवाय अधिवक्ता वाकुडकर यांचे अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी घनिष्ठ संबंध आहे . त्यांच्या या नियुक्तींचे विकास गेडाम,समता बन्सोड, नलिनी आडपवार, चंदा कामडी , सविता मारटकर,विक्रम गुरुनुले, नरेंद्र वाळके, राकेश बुर्रीवार,ओमदेव मोहूर्ले, मिलिंद खोब्रागडे सचिन गुरनूले , कविता दिकोडवार अर्चना ठाकरे व पुंडलिक गोठे यांनी स्वागत केले आहे.
विशेष म्हणजे अधिवक्ता हिमानी वाकुडकर ह्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक सदस्य आहेत.