Home Breaking News Beed dist @news • आ. भिमराव धोंडे यांच्या धामणगाव परिसरातील दौऱ्याला...

Beed dist @news • आ. भिमराव धोंडे यांच्या धामणगाव परिसरातील दौऱ्याला मोठा प्रतिसाद •तीस वर्षांपूर्वी माजी आ. धोंडे यांनी धामणगाव परिसरात प्रचंड विकासकामे केली: माजी पं. स. सदस्य सुदाम झिंजुर्के

142

Beed dist @news

• आ. भिमराव धोंडे यांच्या धामणगाव परिसरातील दौऱ्याला मोठा प्रतिसाद

•तीस वर्षांपूर्वी माजी आ. धोंडे यांनी धामणगाव परिसरात प्रचंड विकासकामे केली: माजी पं. स. सदस्य सुदाम झिंजुर्के

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

माजी आमदार भिमराव धोंडे हे विधानसभा सदस्य असताना आष्टी तालुक्यातील धामणगाव व परिसरातील वाड्या वस्त्या करीता रस्ते, पाझरतलाव व इतर विकासकामे केली असल्याचे पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम झिंजुर्के यांनी या प्रसंगी सांगितले . तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड निधी उपलब्ध करून विकास कामे केली . भविष्यात उर्वरित विकास केला जाईल असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ठिकठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिले .
जनसंपर्क अभियाना अंतर्गत शनिवारी दिनांक २७ जुलै रोजी आष्टी तालुक्यातील धामणगाव व परिसरातील वाड्या वस्त्यांचा दौरा केला . आष्टी /पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी धामणगाव–परिसरातील वाड्या वस्त्यावर फिरून लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजत गाजत व तोफा वाजवुन जोरदार स्वागत करण्यात आले. आष्टी/ पाटोदा/कडा/शिरूर नंतर धामणगाव परिसराचा दौरा केला . शहरात ,वाड्या, वस्त्यावर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुढे बोलताना सुदाम झिंजुर्के यांनी सांगितले की, माजी आमदार भिमराव धोंडे हे शांत संयमी नेतृत्व असून , त्यांनी ३० वर्षापुर्वी विधानसभा सदस्य असताना धामणगाव परिसरातील रस्ते, पाझरतलाव, समाज मंदिर आदी विकास कामे केली . त्यावेळी धामणगाव परिसरातील वाड्या वस्त्यावर जाण्यासाठी रस्तेही नव्हते. भिमराव धोंडे यांनीच रस्ते केले आहेत, उर्वरित विकास करण्यासाठी भविष्यात माजी आमदार भिमराव धोंडे यांना सहकार्य करावे , अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजे भिमराव धोंडे होय . जनसंपर्क अभियानात माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, पं. स. सदस्य रावसाहेब लोखंडे, माजी पं. स. सदस्य अमोल चौधरी, माजी सरपंच सुदाम झिंजुर्के, शहाबुद्दीन सर, किरण नरवडे व इतर मान्यवर उपस्थित होते .
धामणगाव शहरात फिरुन व्यापारी वर्गाशी संवाद साधला, संत सेना महाराज मंदिरात सदिच्छा भेट दिली . हाकेवाडी, बिरंगळ वाडी, राळसांगवी, भिल्ल वस्ती, महाजन वाडी, तिरमल वस्ती, झिंजुर्के वस्ती, वंजारवाडी, बोराडवाडी येथे भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या . ठिक ठिकाणच्या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी आपल्या सार्वजनिक मागण्या केल्या .

नालंदा बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले .
तिरमली वस्तीवरील डॉ. संजय सिनाप्पा गजरे हा युवक त्यांच्या समाजातील पहिला गुरांचा डॉक्टर होण्याचे प्रशिक्षण घेतले आहे त्याबद्दल त्याचा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धामणगाव येथील मारुती ओटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांचे भिमराव धोंडे यांनी सांत्वन केले .
कडा येथील केंद्रीय मुख्याध्यापक महादेव टकले व इंदीरा कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या . दरम्यान पं. स. सदस्य रावसाहेब लोखंडे, राजु चौधरी, बप्पा चौधरी,विजय गाढवे, दत्तोबा चौधरी, जालींदर बिरंगळ, दादा बिरंगळ, कल्याण राऊत, दिपक हाॅस्पिटल, रघुनाथ महाराज, पी. टी. चौधरी , डॉ. अकील, माजी ग्रा.पं. सदस्य संदीप राऊत, बद्रीनाथ शिंदे, प्रभाकर सोनटक्के, आर. बी. बेदरे, अविनाश लोखंडे, प्रदिप बोगावत यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या . वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी बैठकीत माजी पं. स. सदस्य सुदाम झिंजुर्के, माजी पं. स. सदस्य अमोल चौधरी,शहाबुद्दीन शेख, संजय महाजन, ग्यानबा साळवे, राम ससाणे व इतरांची भाषणे झाली. जनसंपर्क अभियाना दरम्यान ठिकठिकाणी , चेअरमन संजय गाढवे, भाऊसाहेब बिरंगळ, डी. टी. लोखंडे, बबनराव बोराडे, बाजीराव चौधरी,दगडू झिंजुर्के, जाफर शेख, सामाजिक कार्यकर्ते विजय गाढवे, राजेंद्र झिंजुर्के, विठ्ठल महाजन, संजय लोखंडे, प्राचार्य नवनाथ चौधरी, डॉ. दिलीप बोराडे, रमेश नरवडे,दिगंबर ओटे, राजाराम बोराडे, दादासाहेब बोराडे, मोहन बोराडे, आण्णा बोराडे , बाबासाहेब बोराडे, दगडू बोराडे, कल्याण राऊत, चौधरी फौजी, सरपंच खंडू हाके, भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब बिरंगळ मुकादम, माजी उपसरपंच संजय निकम, रावसाहेब बिरंगळ, मिठ्ठु बिरंगळ, फुलचंद बिरंगळ , बाळासाहेब पिसाळ, बाळासाहेब काळे, अंबादास काळे, बलभीम काळे, संजय महाजन ,देवराव शिंदे,भिमा फुलमाळी,बाबु गायकवाड, भिमा गायकवाड, बाजीराव फुल माळी, सिनाप्पा गजरे, रावसाहेब राऊत, नारायण कांबळे, प्रा. राजु थोरवे, भरत परदेशी, गायकवाड सर, सुनिल राऊत, शरद सोनवणे, विकास राऊत, विस्तार अधिकारी नितीन गायकवाड, दिपक महाजन,दगडू झिंजुर्के, सुदाम झिंजुर्के, ग्रामपंचायत सदस्य काळु झिंजुर्के, भाऊसाहेब होरकळ, अशोक झिंजुर्के संतोष महाजन, बाबासाहेब महाजन,पोपट महाजन, मुन्ना शेख, ब्रम्हदेव महाजन, बाळू बरडे, कृष्णा बरडे, तानाजी गायकवाड,हभप विष्णू महाराज आंधळे, कैलास गायकवाड, अंकुश महाजन,सतिष गर्जे, बाळासाहेब महाजन, भाऊसाहेब बरडे, कैलास महाजन, महादेव महाजन,ग्यानबा साळवे, दिनकर निकाळजे, वसंत साळवे यांनी भिमराव धोंडे व अजयदादा धोंडे व इतरांचे स्वागत केले .