Gadchiroli dist@News
•Aheri@ माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्याहस्ते गरजूंना छत्री वाटप
• मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा अभिनव उपक्रम
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
अहेरी: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून गरजूंना छत्री वाटप ही अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अहेरी विधानसभेतील विविध गावात मोठ्या प्रमाणात छत्री वाटप केले जात आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मोठ्या प्रमाणात गरजू व रस्त्यावरची दररोजची जगण्याची लढाई करणाऱ्या कष्टाळू व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात छत्र्या भेट देऊन त्यांना पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकतेच मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतः आलापल्ली येथे येऊन शहरात देखील मोठ्या प्रमाणात गरजूंना छत्री वाटप केले. गरीब आणि कष्टाळू लोकांना मोफत छत्री मिळाल्याने त्यांनी आभार व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, माजी प्राचार्य रतन दुर्गे सर, तालुका कार्याध्यक्ष पराग पांढरे, माजी पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोरेम, विनोद कोडापे, दिपक कंनाके,अमोल उरेत, अक्षय मडावी,करण आत्राम, अमोल कंनाके, रोशन उरेत, रमेश आत्राम, सुनिल नैताम,विनोद तलांडे ,रोहित उरेत, चंदु मडावी,विनोद वेलादी, गोपाल कोरेत, सुनिल मडावी, सुरज कुडमेथे, स्वप्निल शेटे, मारोती सडमेक,अमरदीप नुतिकटलावार, पवन तोगरवार,बबलू उईके,सिनू तोगरवार, पोशट्टी सुंकेवार, विजय चेरलावार, लक्ष्मण दुम्पलवार ,रुपेश सल्लम,श्रीनिवास गंजीवार, बापू जंजरलावार,दिपक उईके, मल्लेश गंजीवार, दुर्गय्या कप्पलवार,नागेश कोम्पेल्ली,विठ्ठल बावणे, रमण जुट्टूवार,पोचम पल्लेम, वंदना मडावी,संगीता इष्टाम,रेशमा आत्राम, अर्चना मडावी, राजूबाई तलांडे ,दुर्गाबाई आलाम,चंद्रकला आत्राम, कल्याणी नागपूरवार,रामबाई आलाम, संगीता कंनाके, सरिता सिडाम,पदमा नाईनवार,संगीता तलांडे,लक्ष्मीबाई मडावी, शांताबाई कंनाके, जमुनाबाई कुडमेथे, मीराबाई उईके, दमयंती रादंडी ,उषा येलमुले, शशिकला बामनकर,सिंधू चौधरी, पोचूबाई चेरलावार,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.