Home Breaking News Chandrapur dist@ News • महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सदस्य अधीसेविका वंदना बरडेंचा...

Chandrapur dist@ News • महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सदस्य अधीसेविका वंदना बरडेंचा नागपूरात गौरव ! • उल्लेखनीय कामगिरी बाबत बरडे यांना “पुरस्कार महाराष्ट्राचा -गौरव कर्तृत्वाचा” पुरस्कार बहाल • पुरस्कार समारंभाला सुपरिचित अभिनेत्री सुधा चंद्रन यांची उपस्थिती

208

Chandrapur dist@ News
• महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सदस्य अधीसेविका वंदना बरडेंचा नागपूरात गौरव !
• उल्लेखनीय कामगिरी बाबत बरडे यांना “पुरस्कार महाराष्ट्राचा -गौरव कर्तृत्वाचा” पुरस्कार बहाल
• पुरस्कार समारंभाला सुपरिचित अभिनेत्री सुधा चंद्रन यांची उपस्थिती

सुवर्ण भारत:चंद्रपूर विशेष प्रतिनिधी

फिल्म जगत मधील सुपरिचित अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या प्रमुख उपस्थितीत अधीसेविका वंदना विनोद बरडे यांना “पुरस्कार महाराष्ट्राचा -गौरव कर्तृत्वाचा “ह्या सन्मान पुरस्कारांने नुकतेच गौरविण्यात आले .
हा पुरस्कार समारंभ नागपूर स्थित कोणार्क हाँटेलमध्ये पार पडला .सदरहु कार्यक्रमाचे आयोजन अविनाश बडगे यांनी केले होते.सदरहु कार्यक्रमात ५०व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या वरोरा येथील महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सदस्य अधीसेविका वंदना बरडे यांना फिल्म अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते उपरोक्त पुरस्कार देण्यात आला.
यावेळी वंदना बरडे यांनी अवयव दान, नेत्र दान, देह दान,व रक्त दान करण्याचे आवाहन केले.तर फिल्म अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी जीवन कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाशझोत टाकला .