Home Breaking News Chandrapur dist@ News • पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी : दिनेश...

Chandrapur dist@ News • पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी : दिनेश चोखारे • वरोरा व भद्रावती तालुक्यासह संपूर्ण जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करा

94

Chandrapur dist@ News
• पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी :
दिनेश चोखारे
• वरोरा व भद्रावती तालुक्यासह संपूर्ण जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करा

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतमाल पाण्याखाली आले तर शेतकऱ्यांचे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले तर काही पिक माती खाली दबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सोबत वरोरा व भद्रावती तालुक्यासह संपूर्ण जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पण केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे कि, मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीतुन येथील शेतकरी,शेतमजूर सावरत नाही तोच बँकेकडुन पिक कर्ज काढून तसेच हात उसणवारी रक्कम घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी,रोवणी केली होती.
मात्र जुलै महिण्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस होत असुनधरणाचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले फुगले आहेत.अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी शेतात घुसुन साचुन राहिल्याने उभे धान पिक सडले.
त्यामुळे शेतकरी पुरते अडचणीत आले असून अतिवृष्टीमुळे जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेता व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहुन वरोरा व भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ भरीव मदत देण्यासह मागील वर्षी अतिवृष्टी, नदीला आलेला पुर व त्यानंतर झालेला रोगाचा प्रादुर्भाव,या संदर्भात करण्यात आलेल्या मोका चौकशीच्या आधारे थकीत नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.