Wardha dist @News
•आसिफ खान रस्त्याच्या मागणीला घेऊन उपोषणाला बसणार
सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनीधी, वर्धा
वर्धा:ए.आय.एम.आय.एम चे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांच्या वतीने गेल्या तिन महिन्या पासुन पाकीजा कॉलनी, प्रभाग क्रमांक 18 मधील रस्त्याच्या बांधकाम करण्यात यावे या साठी निवेदन देऊन तसेच न.प. मुख्याधिकारी आणि न.प
बांधकाम विभाग यांना प्रत्यक्ष भेटुन मागणी केली.
पाकीजा कॉलनी मधील मोठे उभ्या दिशेने असणाऱ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट बांधकाम झाले असून त्या रस्त्याना जोडणारे कॉलनी मधील आडवे छोटे रस्ते बांधकाम पासून वंचित राहिले, त्या मुळे रस्त्यानं मध्ये कमालीची खाल उंच अशी गॅप तयार झाली असून छोटे मोठे अपघात तिथे कॉलनी मधील रहिवाश्यांचे होत आहे.
आडव्या रस्त्यांचे बांधकाम न झाल्या मुले पावसाचे पाणी त्यात साचुन आवागमन करण्यास अनेक अडचणीचा सामना रहीवाष्याना करावा लागत आहे, याच रोडला जोडणाऱ्या रोड वर मदरसा असुन साधारण दोनशे विद्यार्थी या मदरशात शिक्षणाचे धडे घेण्या करिता येतात, पण येण्या जाण्याचा रस्ताच बंद पडून असल्या कारणाने गेल्या काही दिवसांन पासुन मदर्श्याला सुट्टी देण्यात आली, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, पाण्याच्या डबक्यात अनेक रोग राई पसरविणारे डास जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत नगर पालिका प्रशासनाच्या वतीने या रस्त्याला तत्काळ सिमेंट काँक्रिट बांधकाम करायला हवे होते.
नगर पालिकेला याचे गांभीर्य लक्षात यावे या उद्देशाने अनेक वेळा निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन रत्याच्या बांधकामाची मागणी आसिफ खान यांच्या कडून करण्यात आली.
सरते शेवटी नगर पालिकेच्या लॉली पोप प्रवृत्तीच्या निषेधार्थ आसिफ खान यांनी नगर पालिका समोर रात्याच्या मागणीला घेऊन आमरण उपोषणाला बसणार आहे याची रीतसर माहिती नगरपालिका प्रशासन व पोलिस विभाग वर्धा यांना अर्जाद्वारे आसिफ खान यांच्या वतीने देण्यात आली आहे, सदर आमरण उपोषण दरम्यान माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार नगर पालिका मुख्याधिकारी तसेच नगर पालिका बांधकाम मुख्य अभियंता हे जबाबदार राहील असा इशारा आसिफ खान यांच्या वतीने देण्यात आला.
