Home Breaking News Chandrapur. City@ News •सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची...

Chandrapur. City@ News •सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल. – आ. किशोर जोरगेवार

42

Chandrapur. City@ News

• सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल – आ.किशोर जोरगेवार

चंद्रपूर : किरण घाटे

शाळा ही केवळ शैक्षणिक केंद्र नसून, ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या या नवीन सांस्कृतिक भवनामुळे विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्यातील कलागुण अधिकाधिक फुलतील. या भवनातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची एक उत्तम संधी मिळेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

बाबूपेठ येथील इग्लास भवानी हायस्कूल येथे आमदार निधीतून सांस्कृतिक भवन तयार करण्यात आले आहे. या भवनाचे आज आमदार जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका निर्मला मेहरकुरे, अविनाश वडिलालवार, संतोष साठे, भास्कर राऊत, सुरेश करकडे, कुमारी रजनी महाकाळकर, कुमारी रजनी राखडे, अर्जुन देशमुख, विकास रामटेके, मुरलीधर पाखमोडे, दादाजी श्रीरामे, कपिल भूषणवार, मंगेश श्रीरामे, शीतल खवसे, ज्योती बावणे, प्रज्ञा बनकर, जाधव, चंदू गाटे, राजू कोटकर, दिनकर, भास्कर कष्टी, यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या सायली येरणे, नंदा पंधरे, सविता दंडारे, कल्पना शिंदे, अल्का मेश्राम आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, इग्लास भवानी हायस्कूल मागील अनेक वर्षांपासून बाबूपेठ सारख्या भागात शिक्षण सेवा देण्याचे काम करत आहे. या शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ मशीन, ग्रीन जिम आपण उपलब्ध करून दिली आहे. तसेच येथे सांस्कृतिक भवन तयार करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देता आला याचा आनंद आहे. आज या भवनाचे काम पूर्ण झाले आहे.

शालेय जीवनात शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील महत्त्वाचा वाटा असतो. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सहकार्य यांचा अनुभव येतो, जो त्यांच्या भावी जीवनासाठी आवश्यक असतो. या नव्या भवनामुळे आता विविध स्पर्धा, नाट्यप्रयोग, संगीत आणि नृत्य यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जावे, असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. यावेळी शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.