Home Breaking News Chandrapur City@ News •अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक खिडकी उपक्रम सुरु करा...

Chandrapur City@ News •अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक खिडकी उपक्रम सुरु करा -आ. किशोर जोरगेवार

16

Chandrapur City@ News
•अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक खिडकी उपक्रम सुरु करा -आ. किशोर जोरगेवार

सुवर्ण भारत:किरण घाटे

नागपूर व अमरावती विभागातील निवासी कारणांसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत नझुल धारक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी एक खिडकी उपक्रम सुरु करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिल्या आहे.

अतिवृष्टीमुळे नागरिकांचे झालेले नुकसान, भुस्खलनाच्या घटना आणि मतदार संघातील विकास कामांसदर्भात आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सदर सुचना केल्या असून एका आठवड्यात अभय योजनेकरिता एक खिडकी उपक्रम सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

ज्या नझूल जमिनी निवासी कारणासाठी लिलावाद्धारे, प्रीमियम अथवा अन्यप्रकारे भाडे तत्त्वावर दिल्या आहेत, त्यांनाच अभय योजना ३१ जुलै २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. नझूल जमिनीच्या भोगवटादार- १ करण्यासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील बाजारमूल्याच्या २ टक्के एवढा प्रीमिअम आकारण्यात येणार आहे. तर फ्री होल्ड करण्यासाठी अन्य अटी शर्ती कायम राहणार आहे. नझूल जमिनीचे वार्षिक भूभाड्याची आकारणी प्रचलित दराने ३१ जुलै २०२५ पूर्वी कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. त्यानंतर भूभाडे न भरल्यास थकीत भूभाडे व त्यावर वार्षिक १० टक्के व दंडनीय व्याज आकारण्यात येईल, असे निर्णय महाराष्ट्र शासणाच्या वतीने घेण्यात आले आहे.

त्यानुसार नझुल जागेसाठी सदर अभय योजना ही दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत मर्यादित आहे. अश्या परिस्थितीत नागरिक सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडे गेले असता या संबधित यंत्रणा नसल्याने कागदपत्रांची पूर्तता करतांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे मागील चार महिन्यापासून एकही नागरिकांना या लोकहित अभय योजनेचा लाभ मिळालेला नाही. समर्पित कार्य यंत्रणा अस्तित्वात नसल्याने सदर योजनेचा लाभ नागरिकांना वेळेत घेणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. चंद्रपूर मनपा कार्य क्षेत्रात १३००० च्या वर नझुल धारक आहे. त्यामुळे सदर योजना प्रभावीपने राबविण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून नागरिकांना नझुल जमिनीसाठी लोकहित विशेष अभय योजने च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समर्पित दालन (एक खिडकी योजना) तयार करून आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती तातडीने करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिल्या आहेत.