Home Breaking News Chandrapur city@ News • गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजाच्या वतीने येत्या १८ऑगस्टला चंद्रपूरात...

Chandrapur city@ News • गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजाच्या वतीने येत्या १८ऑगस्टला चंद्रपूरात होतोय गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार! • अनेक मान्यवर मंडळींची राहणार उपस्थिती !

49

Chandrapur city@ News
• गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजाच्या वतीने येत्या १८ऑगस्टला चंद्रपूरात होतोय
गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार!
• अनेक मान्यवर मंडळींची राहणार उपस्थिती !

चंद्रपूर- किरण घाटे

गोल्ला- गोलकर- गोलेवार समाजाच्या वतीने येत्या १८ऑगस्टला चंद्रपूर शहरात समाजातील गुणवंत विद्यार्थी तथा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सपत्नीक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या आयोजित कार्यक्रमाला राज्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान आज शनिवार दि.३ऑगस्टला चंद्रपूर जटपूरा स्थित पंच तेली हनुमान मंदिरात समाजातील पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.
सदरहु बैठकीला समाजाचे जेष्ठ सदस्य मनोहर कोपूलवार,चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार सचिव महेश मॅकलवार,संघटक प्रविण भिमनवार कोषाध्यक्ष क्रिष्णाजी दाऊवार, कार्यकारणी सदस्य विवेक गुडलावार,विलास दंडिकवार प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजातील बांधवांनी तनमनाने सहकार्य करावे असे आवाहन अजय मॅकलवार यांनी केले.गत वर्षी याच समाजाने चंद्रपूर नगरीत एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते .