Bhadravti city@ News
• स्वतःला कमी न समजता हिंमतीने पुढे जा- किरण साळवींचा महिला व तरुणींना मोलाचा सल्ला!
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
भद्रावती:कुठल्याही क्षेत्रात वावरताना किंवा कार्य करता स्वतःला कमी न समजता हिंमतीने पुढे जावे असा मोलाचा सल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भद्रावती नगरीतील व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक -अध्यक्ष तथा किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कु.किरण साळवी यांनी समाजातील महिला व तरुणींना दिला.
त्या आज रविवारी एका मुलाखती दरम्यान बोलत होत्या.सामाजिक कार्य करतांना त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यातील सामाजिक संघटना व वृत्तपत्रांकडून महाराष्ट्र रत्न ,हिरकणी ,महिला कर्तृत्ववान महिला सन्मान असे अनेक पुरस्कार आज पर्यंत प्राप्त झाले आहे.अतिशय शांत व प्रेमळ स्वभाव असणाऱ्या समाजसेविका साळवी यांच्या भद्रावतीच्या कार्यालयात कुठल्याही कामानिमित्त आलेल्या व्यक्तींची त्या आस्थेने विचारपूस करीत त्यांना योग्य सल्ला देतात.वेळ प्रसंगी त्या त्यांच्या मदतीला धावून जातात.उच्चशिक्षित साळवी यांच्या आईवडीलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले .आजही संस्थेच्या माध्यमातून त्यांचे निरंतर सामाजिक कार्य सुरू आहे.
सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचे सदैव आपणांस मार्गदर्शन लाभत असल्याचे त्या म्हणाल्या. रंज्जू मोडक ह्या आपल्या जिवलग मैत्रिण असल्याच्या किरण साळवी या वेळी सांगण्यास विसरल्या नाहीत. त्यांची एका कार्यक्रमात भेट झाली त्याच दिवसांपासून त्यांची घट्ट मैत्री झाली व ती आजही कायम आहे.