Home Breaking News Chandrapur city@ News ⭕भर पावसाळ्यातही रेतीची अवैध वाहतूक: खनिकर्म विभागाने दिला दोन...

Chandrapur city@ News ⭕भर पावसाळ्यातही रेतीची अवैध वाहतूक: खनिकर्म विभागाने दिला दोन रेती तस्करांना दणका!

123

Chandrapur city@ News
⭕भर पावसाळ्यातही रेतीची अवैध वाहतूक: खनिकर्म विभागाने दिला दोन रेती तस्करांना दणका!

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर:भर पावसातही चंद्रपूर शहरातच नाही तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात रेतीची वाहतूक सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
रेती तस्करांनी या आधीच रेतीची साठवणूक करुन ठेवली असल्यामुळे ही वाहतूक होत असल्याचे सर्वत्र बोलल्या जाते.
दरम्यान काल चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाच्या पथकांनी पाळत ठेवत दोन रेती तस्करांची अवैध रेतीची वाहने ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
ही कारवाई वेकोली दुर्गापूर परिसरात खनिज निरीक्षक दिलीप मोडके व भौ.मा.प्र.स.के.एम.बनकर यांनी केली आहे.
जप्त वाहनांचा क्रमांक अनुक्रमे MH-34, AB 1842 व MH34-M 74o6 असा आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांत चांगलीच खळबळ उडाली आहे.दरम्यान सदरहु कारवाईचे जनतेंनी स्वागत केले आहे.