Home Breaking News Bhadrawati taluka@news • महाविद्यालयातील वार्षिकांक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देणारे समर्थ...

Bhadrawati taluka@news • महाविद्यालयातील वार्षिकांक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देणारे समर्थ व्यासपीठ :प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे

83

Bhadrawati taluka@news
• महाविद्यालयातील वार्षिकांक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देणारे समर्थ व्यासपीठ :प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे

सुवर्ण भारत : मनोज मोडक
तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती (प्रतिनिधी) : जग झपाटाने बदलत चालले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वप्रकारची कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज झाली आहे. ती कौशल्ये प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता आहे. त्यासाठी महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणासोबतच राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेऊन आपल्यातील उपजत कलागुणांचा विकास करून घेतला पाहिजे. केवळ पदवी मिळवून आपले व्यक्तिमत्व पूर्ण होत नसते. त्यासोबतच लेखन कौशल्ये ,वक्तृत्व कला, संभाषण कौशल्ये ,नेतृत्व इत्यादी गुणांचा विकास झाला पाहिजे. युवा वर्गाने आपली विचारशक्ती प्रगल्भ करण्याकरता चांगल्या पुस्तकांचे वाचन व विचार आत्मसात केले पाहिजेत. वाचनाचा व्यासंग माणसाला प्रगल्भ बनवितो व त्यातून उत्तुंग भरारी घेण्याचे सामर्थ्य लाभते. हे सर्व महाविद्यालयीन वार्षिकांकाच्या माध्यमातून प्राप्त करता येईल असे विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित वार्षिकांक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ प्राध्यापक तथा वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश पारेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. उमाटे म्हणाले की, बालपणीचे संस्कार व शालेय शिक्षण यातून घडविलेल्या जीवनाला सुयोग्य आकार देण्याचा कालखंड म्हणजे महाविद्यालय जीवन. शैक्षणिक विकासासोबतच व्यक्तिमत्व महत्त्वाचा विकास होणे व त्यातून सुसंस्कृत, प्रामाणिक व जबाबदार नागरिक घडविणे हेच शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.अमोल ठाकरे, प्रास्ताविक डॉ.रमेश पारेलवार, आभार इंग्रजी विभागप्रमुख डॉ. गजानन खामनकर यांनी मानले. यावेळी योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे पदाधिकारी पुरूषोत्तम मत्ते, शेखर घुमे यांच्यासह उपप्राचार्य तथा ग्रंथालय विभागप्रमुख डॉ . सुधीर आस्टुनकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती राखुंडे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रकाश तितरे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. संगिता बांबोडे, इतिहास विभागप्रमुख डॉ.जयवंत काकडे, डॉ. यशवंत घुमे, डॉ.सुहास तेलंग, प्रा.मोहीत सावे,प्रा.रामकृष्ण मालेकर, प्रा. खोजराज कापगते, प्रा.नरेंद्र लांबट, प्रा.धनंजय बेलगांवकर,प्रा.श्रीकांत दाते, प्रा.सुभाष खोके, प्रा. राजेश बैरम यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते.