Home Breaking News Chandrapur taluka@ News •घूग्गुस-पडोली-ताडाली व चंद्रपूर मार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी :...

Chandrapur taluka@ News •घूग्गुस-पडोली-ताडाली व चंद्रपूर मार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी : ब्रिजभूषण पाझारे

585

Chandrapur taluka@ News
घूग्गुस-पडोली-ताडाली व चंद्रपूर मार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी : ब्रिजभूषण पाझारे

सवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर:घूग्गुस-पडोली-ताडाली मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय गंभीर असून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या मागणीसाठी भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी पडोली ठाणेदार यांना रिपोर्ट दिला आहे आणि खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.

ब्रिजभूषण पाझारे यांनी स्पष्ट केले की, “रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कारवाई करावी आणि खड्डे बुजवावेत. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.”

यासोबतच, पाझारे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “मी स्वतः या रस्त्याची पाहणी केली असून पडोली ठाणेदारांना रिपोर्ट सादर केला आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर तातडीने कारवाई केली नाही, तर आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करणार आहोत.”