Ballarpur city@news
•बल्लारपूर शहरातील नजुल धारकांना जमिनीचे पट्टे मिळणार ना सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
•नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडु नये : चंदन सिंह चंदेल
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर:ना.सुधीर मुनगंटीवार वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या पुढाकारातून नजुल धारकांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिये ची सुरुवात आज दि.६/८/२०२४ रोज मंगळवार ला चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ म.रा. यांच्या प्रमुख उपस्थितीत साईबाबा वॉर्ड,शिवाजी वॉर्ड बल्लारपुर येथून झाली.
चंदेल यांनी नागरिकांना सदर प्रक्रिया हि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारातून होत असुन याकरिता नागरिकांना कोणतेही हाल कष्ट न देता संबंधित एजन्सीला सहकार्य करून आपली प्रक्रिया पूर्ण करून घेण्याकरिता आवाहन केले.
दरम्यान नागरीकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडु नये तसेच कोणीही भ्रम पसरविण्याचे काम करत असेल तर त्याची तात्काळ दखल घेऊन भाजपा कार्यालय किंवा भाजपा नेत्यांना कळवावी.ही पट्टे वाटप प्रक्रिया प्रथम चरणात फक्त नजुल धारकांसाठी आहे.या प्रसंगी अनेक प्रश्नात्मक अडचणीला चंदेल यांनी पूर्णतः सोडवण्याचे नागरिकांना आश्वासीत केले.
सदर प्रक्रिया ही संपुर्ण शहरात राबविण्यात येणार असुन लवकरात लवकर नजुल धारकांना जमीनीचे पट्टे देण्यात येईल ज्यामुळे त्यांना केंद्राच्या व राज्य सरकार च्या योजनांचा लाभ घेता येईल.
या वेळी भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, शहर
सचिव इंजि. देवेंद्र वाटकर,माजी नगरसेविका सौ.सुवर्णा भटारकर,भाजप नेता अरुण भटारकर, किशोर मोहुर्ले,
डॉ. अनिल बोम्मावार,सौ.शालू कुमरे,बुथ प्रमुख- राहुल कोत्तावार,विशांक ठाकुर,राहुल चौहान भाजपा कार्यकर्ता मनोज बहुरिया, नयन बोम्मावार,प्रिझम वाढई,नंदू कोणपट्टीवार,सुरज टपाले,स्वप्नील टपाले व अन्य कार्यकर्ता आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




