Home Breaking News Ghugus city @news • नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारा विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन...

Ghugus city @news • नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारा विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन संपन्न • शहराची साफसफाई व विकासकामे न झाल्यास शहरातील कचरा नगरपरिषदेत फेकणार : राजुरेड्डी

515

Ghugus city @news

• नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारा विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन संपन्न

• शहराची साफसफाई व विकासकामे न झाल्यास शहरातील कचरा नगरपरिषदेत फेकणार : राजुरेड्डी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके

घुग्घूस : चंद्रपूर तालुक्यातील सर्वात मोठा औद्योगिक शहर व प्रदूषणनात महारष्ट्रात प्रथम क्रमांक पटकविलेला पन्नास हजार लोकवस्तीच्या शहरात गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषद अस्तित्वात आली असून सध्या शहरात प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जितेंद्र गादेवार हे नगरपरिषदेचे काम पाहत आहे. ते आठवड्यातून केवळ दोनच दिवस येत असतात त्यांच्या येण्या – जाण्याचा व नागरिकांना भेटण्याचा ही वेळापत्रक नसल्याने नागरिकांशी त्यांची भेटच होत नसल्याने नागरिकांचे कुठल्याही प्रकारचे काम होत नाही.

पावसाळ्याचे दिवस शुरु असून नाली गटारी घाणीने तुंबलेल्या आहेत घाण पाणी नागरिकांच्या घरात जात आहेत शहरात अनेक ठिकाणी तर नाल्याच नाही रस्ते नाही पथदिवे महिनो – महिने लावल्या जात नाहीत
नागरिकांनी तक्रारी दिल्यास दिवेच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते शहरात जे नाल्या बनविण्यात येत आहेत ते अगदी निकृष्ट दर्जाचे आहेत.

शहराला स्थायी मुख्याधिकारी देण्यात यावा शहरातील रस्ते, नाली, पथदिवे, स्वच्छता व अन्य समस्या तातळीने सोडविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते यांच्या नेतृत्वाखाली स्व.प्रमोद महाजन मंच आठवडी बाजार येथे एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले.
महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते प्रवीण पडवेकर, युवक काँग्रेस चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश अड्डूर, एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष शफक शेख, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मालेकर गुरुजी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सदलावार, मुन्ना लोहाणी, शामराव बोबडे, सत्य नारायण डकरे,किरण मोरे यांनी उपस्थिताना संबोधित केले.

आजच्या आंदोलना प्रसंगी माजी उप सरपंच सुधाकर बांदूरकर, अलीम शेख, युवक काँग्रेस जिल्हा सचिव सूरज कन्नूर, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, युवक अध्यक्ष तौफिक शेख, मोसीम शेख,विशाल मादर,ज्येष्ठ नेते देविदास पुणघंटी,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,राष्ट्रवादी युवा अध्यक्ष शरद कुम्मरवार,महिला महासचिव पदमा त्रिवेणी, महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील, अनिरुद्ध आवळे,रोहित डाकूर,सुनील पाटील, कुमार रुद्रारप,बालकिशन कुळसंगे, सचिन नागपुरे, निखिल पुणघंटी,कुमार रुद्रारप,थामस अर्नाकोडा,दिपक कांबळे, हरीश कांबळे,शहंशाह शेख,अंकुश सपाटे कपील गोगला व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व नागरिकगन उपस्थित होते
आंदोलनाचे सूत्र संचालन देवेद्र भंडारी यांनी केले.