Home Breaking News Ballarpur taluka@ News • वंचित बहुजन आघाडी तर्फे “हर घर संविधान घर...

Ballarpur taluka@ News • वंचित बहुजन आघाडी तर्फे “हर घर संविधान घर घर संविधान” अभियानची सुरुवात येत्या १५ ऑगस्टला

109

Ballarpur taluka@ News
• वंचित बहुजन आघाडी तर्फे “हर घर संविधान
घर घर संविधान” अभियानची सुरुवात येत्या १५ ऑगस्टला

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन , बल्लारपूर तालुका व शहराच्या वतीने उपरोक्त अभियानची सुरुवात होणार आहे.

संविधान दिनाला दि.२६-११-२४ला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने “हर घर संविधान ” “घर घर संविधान” अभियानची सुरुवात १५ ऑगस्ट २०२४ रोजी बल्लारपूर शहरातून होणार आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

सदरहु अभियानाच्या अंतर्गत, संपूर्ण बल्लारपूर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालतील. या काळात संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, रॅली आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

कार्यक्रमात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. अभियानाचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत भारतीय संविधानाचे महत्व पोहोचविणे व संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचे महत्व नागरिकांना पटवून देणे आहे.

या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून संविधानाचे महत्व आणि त्याचे पालन करण्याची जाणीव प्रत्येकाला होईल.