Home Breaking News Chandrapur dist@ news • आज होतेय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची चंद्रपूरातील विस...

Chandrapur dist@ news • आज होतेय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची चंद्रपूरातील विस कलमी सभागृहात बैठक! • शिवणी वनविभाग प्रकरणात होणार चर्चा! • दत्तात्रय समर्थ व मुरलीधर गायकवाड यांना उपस्थित राहण्याचे समितीचे पत्र !

234

Chandrapur dist@ news

• आज होतेय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची चंद्रपूरातील विस कलमी सभागृहात बैठक!
• शिवणी वनविभाग प्रकरणात होणार चर्चा!
• दत्तात्रय समर्थ व मुरलीधर गायकवाड यांना उपस्थित राहण्याचे समितीचे पत्र ! 

चंद्रपूर  :किरण घाटे

गेल्या काही महिन्यांपासून वनविभाग शिवणी येथील रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी व्हावी या मागणीसाठी शिवणीचे सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड व सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

याच संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल आयुक्त नागपूर या शिवाय वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी पत्र व्यवहार केला होता.
सदरहु लेखी निवेदनाच्या अनुषंगाने चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांनी या बाबत वनविभागाला सविस्तर अहवाल मागितला होता.

आज सोमवार दि.१२ऑगस्टला दुपारी ४ वाजता स्थानिक विसकलमी सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलन समितीची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.

याच बैठकीत उपरोक्त विषय चर्चेला येणार आहे.सदरहु बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र समितीने गायकवाड व समर्थ यांना पाठविले आहे.