Home Breaking News Varora taluka@ News • जागतिक आदिवासी दिनानिमित्त युवा सेना तर्फे मसाला भात...

Varora taluka@ News • जागतिक आदिवासी दिनानिमित्त युवा सेना तर्फे मसाला भात वाटप

20

Varora taluka@ News
• जागतिक आदिवासी दिनानिमित्त युवा सेना तर्फे मसाला भात वाटप

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा: जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज बांधवांनी रॅली काढून आदिवासी दिन साजरा केला. ही रॅली मालवीय वार्ड,शहीद चौक ते आंबेडकर चौक अशी काढण्यात आली.या रॅलीचा समारोप आंबेडकर चौक येथे झाला. आंबेडकर चौक येथे समाज बांधवा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या समाज बांधवांकरिता व इतर लोकांकरिता युवा सेना माजी जिल्हाप्रमुख मनीष जेठांनी यांच्यातर्फे मसाला भातचे वाटप करण्यात आले. मनीष जेठांनी हे अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.त्यांच्या या कृतीच्या बोध घेऊन समाज बांधवा तर्फे या कार्यक्रमात त्यांच्या सत्कार करण्यात आला.