Home Breaking News Chandrapur dist@News •कास्ट्राईब कर्मचारी महासंघचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक •दिवसीय...

Chandrapur dist@News •कास्ट्राईब कर्मचारी महासंघचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक •दिवसीय धरणे आंदोलन! •आंदोलनात शेकडों कर्मचारी बांधव सहभागी!

29

Chandrapur dist@News
•कास्ट्राईब कर्मचारी महासंघचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक •दिवसीय धरणे आंदोलन!
•आंदोलनात शेकडों कर्मचारी बांधव सहभागी!

चंद्रपूर :किरण घाटे

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती व सरळ सेवेतील आरक्षण तात्काळ लागू करणे ,१नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट जूणी पेंशन योजना लागू करणे , कंत्राटी नोकर भरती धोरण तात्काळ कायमस्वरूपी रद्द करणे ,सन २०१९ते २०२३ पर्यंत जिल्हा शिक्षक प्राप्त शिक्षकांना थांबवलेली जादा वेतन वाढ पूर्ववत सुरू करणे , दहा -विस -तीस ची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे आदिं मागण्यांसाठी आज दि.१३ऑगस्टला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडों कर्मचारी बांधव स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.दरम्यान त्यांच्या एका शिष्टमंडळाने आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची संध्याकाळी भेट घेत त्यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन दिले व या रास्त मागण्यांबाबत त्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

सदरहु शिष्टमंडळात प्रामुख्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष अशोक राऊत , का.जि.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजकन्या ताकसांडे, का.वन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत राखूंडे,का.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर बारसागडे या शिवाय प्रेमचंद वाकडे, मेघराज उपरे, रमेश चव्हाण,विजय शेंद्रे,प्रकाश गायकवाड,चक्रधर साठे, सुनिल नगराळे,कालीदास वाळके,कैलास कांबळे, भास्कर रामटेके, कविराज मानकर,प्रमोद गेडाम,विकास पळवेकर,वनदेश फूलझेले आदिं पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.