Home Breaking News Chandrapur city@News • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने – चंद्रपूर पंचायत समितीचा उपक्रम...

Chandrapur city@News • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने – चंद्रपूर पंचायत समितीचा उपक्रम ! • उमेदच्या वतीने आयोजित रानभाजी विक्री महोत्सवाला मिळतोय ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद ! • महोत्सवाला बिडीओ धनंजय साळवेंची भेट!

48

Chandrapur city@News
• स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने –
चंद्रपूर पंचायत समितीचा उपक्रम !
• उमेदच्या वतीने आयोजित रानभाजी विक्री महोत्सवाला मिळतोय ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद !
• महोत्सवाला बिडीओ धनंजय साळवेंची भेट!

चंद्रपूर – किरण घाटे

चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उ मेदच्या वतीने काल सोमवार पासून सुरू झालेल्या राणभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बिएमएम शितल देरकर यांनी आज एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीस सांगितले.
चंद्रपूर पंचायत समितीच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून बिडीओ धनंजय साळवे यांनी काल या महोत्सवाला भेट देत तेथील प्रत्येक स्टाॅलची पाहणी केली.

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या हिरव्या राणभाज्यांना ग्राहकांची चांगलीच मागणी होत असल्याचे आज प्रत्यक्ष दिसून आले.

महोत्सवात प्रामुख्याने माधूरी चौधरी, भारती पेंदाम, सुनिता इटकेलवार, आकांक्षा मरसकोल्हे, रजनी आंबडरे, उज्वला रामटेके,सोनम जांभूळकर,छाया उपरे,शांता मोरे,पायल साखरकर, इंदिरा कोरेवार, तक्षशिला देवगडे यांचा सहभाग राहिला.