Home Breaking News •लाडकी बहिण योजना आ. किशोर जोरगेवारांच्या मदत केंद्राच्या माध्यमातून हजारों लाडक्या बहिणींचे...

•लाडकी बहिण योजना आ. किशोर जोरगेवारांच्या मदत केंद्राच्या माध्यमातून हजारों लाडक्या बहिणींचे केले अर्ज दाखल! •बॅंक खात्यात ३ हजार रुपये झाले जमा

19

•लाडकी बहिण योजना आ. किशोर जोरगेवारांच्या मदत केंद्राच्या माध्यमातून हजारों
लाडक्या बहिणींचे केले अर्ज दाखल!

•बॅंक खात्यात ३ हजार रुपये झाले जमा!

चंद्रपूर:किरण घाटे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अधिकाधिक बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली होती. शासनाच्या वतीने काल, अनेक बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा करण्यात आले.

दरम्यान आज शुक्रवारी शेकडों लाडक्या बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले.

राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेबाबत अनेक महिलांना योग्य माहिती नसल्याने अर्ज दाखल करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार जोरगेवार यांनी शहरातील विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात हे मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. या मदत केंद्राच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना योग्य माहिती देऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आले. या सर्व मदत केंद्रांचा हजारों महिलांनी लाभ घेतला.
सदरहु केंद्रांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. ही योजना गरजू बहिणींसाठी आर्थिक आधार ठरली आहे.
याच पार्श्वभूमीवर, आज शुक्रवारी, शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार जोरगेवार यांचे आभार व्यक्त केले.

आमदार जोरगेवार यांनी लाडकी बहिण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांचे जीवन थोडेसे सुसह्य झाले आहे. आमदार जोरगेवार यांनी केलेल्या या कार्यामुळे महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, महिलांची भूमिका आपल्या समाजात नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. आपल्या बहिणी, मुली, आणि मातांनी आपल्या संस्कृतीचा, कुटुंबाचा आणि समाजाचा पाया मजबूत केला आहे. त्यांच्यावर अनेकदा जबाबदाऱ्या आणि आव्हाने येतात, आणि त्या त्या परिस्थितीतून स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळतात. त्यांच्या या प्रवासात, भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना‘ यासारख्या उपक्रमांमुळे अनेक महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. आपण आपल्या लाडक्या बहिणींना केवळ आर्थिक मदत देत नाही, तर स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध प्रशिक्षण शिबिरं राबवत त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या स्वप्नांना पंख देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले.
यावेळी काही महिलांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “या योजनेबाबत माहिती मिळाली होती, परंतु कोणते कागदपत्र द्यायचे याची योग्य माहिती मिळत नव्हती. ‘लिंक नाही’ असे कारण सांगून अर्ज स्वीकारला जात नव्हता, त्यामुळे फॉर्म न भरण्याचेही आम्ही ठरवले होते. मात्र नंतर आमदार जोरगेवार यांच्या मदत केंद्राबाबत माहिती मिळाल्याने तेथे भेट दिली आणि नि:शुल्क आमचा अर्ज या केंद्राच्या माध्यमातून दाखल केला. नसलेली कागदपत्रेही या मदत केंद्राच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आम्हा लाडक्या बहिणींना या केंद्राच्या माध्यमातून मोठी मदत मिळाली आहे,” असे बहिणींनी म्हटले आहे.