Home Breaking News स्वातंत्र्य दिनी चंद्रपूरात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार!

स्वातंत्र्य दिनी चंद्रपूरात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार!

23

• स्वातंत्र्य दिनी चंद्रपूरात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार!

किरण घाटे
चंद्रपूर:शासकीय कार्य उत्कृष्टपणे करणारे चंद्रपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह महसूल विभागात आपल्या कार्याची विशेष छाप सोडणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार सचिन पाटील, मूल तहसिल कार्यालयातील लिपिक रोहित शास्त्रकार या शिवाय गोपाल निखूरे ,टी.ए.चव्हाण, रमेश मोडक नागसेन वाघमारे,योगेश लोंढे यांना स्वातंत्र्य दिनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार वरोरा पंचायत समितीला बहाल करण्यात आला.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्रसंग्राम सैनिक, लोक प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व प्रशस्तीपत्र प्राप्त करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे सहज सुचलंच्या संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार,कु.किरण साळवी यांनी अभिनंदन केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या सत्कार!