Home Breaking News Pombhurna taluka News •जुन्या बस स्टॅंड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव!...

Pombhurna taluka News •जुन्या बस स्टॅंड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव! •पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार ढोलेंचे उपोषण मागे.. •क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या आमच्यासाठी ऊर्जेचे स्त्रोत!

44

Pombhurna taluka News
•जुन्या बस स्टॅंड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव!

•पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार ढोलेंचे उपोषण मागे..

•क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या आमच्यासाठी ऊर्जेचे स्त्रोत!

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर

पोंभुर्णा :शहरातील जुना बसस्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात यावे ही मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते भुजंग ढोले यांनी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते; आज त्यांच्या उपोषणाची सांगता झाली असून पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार नगरपंचायतीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने ठराव करून स्थानिक जुना बसस्टँड चौकाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात येईल असे पत्रकचं उपोषणकर्त्या भुजंग ढोले यांना दिले.

याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थित राहून जुना बसस्टँड चौक यापुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक म्हणून ओळखला जाईल, असे सांगत आनंद व्यक्त केला.

दि. १६ ऑगस्टपासून भुजंग ढोले यांचे आमरण उपोषण सुरू होते; त्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आजच्या आज उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करून नगरपंचायतीच्या माध्यमातून तसा ठराव करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार आज सकाळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, नगरसेविका नंदाताई कोटरंगे, आकाशी गेडाम, श्वेता वनकर, रोहिणी ढोले, शारदा गुरनूले, नगरसेवक संजय कोडापे, दर्शन गोरंटीवार, महेश रणदिवे, उषा गोरंतवार यांनी सर्वसंमतीने ठराव करून उपोषणकर्त्या भुजंग ढोले यांना ठरावाची प्रत सुपूर्त केली.
त्यामुळे उपोषणस्थळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार व शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे यांचे हस्ते लिंबूपाणी पिऊन भुजंग ढोले यांनी उपोषण संपविले.