Home Breaking News •शेडवाही (भारी) येथील नाल्यावरील पुलाची दुरावस्था, पुलाची तात्काळ दुरस्ती करण्यात यावी ...

•शेडवाही (भारी) येथील नाल्यावरील पुलाची दुरावस्था, पुलाची तात्काळ दुरस्ती करण्यात यावी •गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी

45

•शेडवाही (भारी) येथील नाल्यावरील पुलाची दुरावस्था, पुलाची तात्काळ दुरस्ती करण्यात यावी

•गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी

सुवर्ण भारत:मनोज गोरे

जिवती :- जिवती तालुक्यातील भारी वरून शेडवाही मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

जिवती तालुक्यामध्ये समस्यांचा भडीमार आहे, पावसाळ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, तसेच दळणवळणाच्या मार्गावरही नागरिकांना मोठी कसोटी करावी लागत आहे, तालुक्यातील शेडवाई (भारी) येथील नाल्यावरील पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत अनेकवेळा लक्षात आणून देखील या समस्या कडे दुर्लक्ष होत आहे.

जिवती तालुक्यातील शेडवाई भारी बाबापुर आणि मराई पाटन रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलाची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांची मोठी हाल अपेष्टा होत आहे, याबाबत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके आणि भारी ग्राम पंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटणाके यांनी नाल्यावरील पुलाची तातडीने दुरस्ती करण्याची मागणी केली आहे.

भारी क्षेत्रातील लखमापूर येथील रस्त्याचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत अनेक वेळा पंचायत समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी निवेदन देऊनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करत असताना मोठी कसोटी करावी लागत आहे. मग स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकं कुणाच्या समस्येकडे लक्ष करत आहे असा प्रश्न भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी केला आहे.

चंद्रपुर, शंकरपठार ते भारी बससेवा सुरू करण्यात यावी तसेच राजुरा, भारी ते बाबापूर बससेवा सुरू करण्याची मागणी सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी केली गेल्या दीड महिन्यापासून अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा करूनही प्रशासन आणि लोक्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही आमचे प्रश्न कुणाकडे मांडायचे असा सवालही कोटनाके यांनी केला आहे. अश्या नाकर्त्या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिवकल्या शिवाय राहणार नाही, सामान्य जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करणारा लोकप्रतिनिधी कधीही विकासपुरुष होऊ शकत नाही, पहाडावरच्या समस्या सोडवण्यासाठी पहाडाचे एक वेगळ नेतृत्व निर्माण व्हावं ते पहाडावरची लोकचं निर्माण करतील आता पहाडाचा वापर आता मतदानापुरता होऊ द्यायचा नाही असे मत भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी केले आहे.