Home Breaking News Gadchiroli dist News • टी-10 क्रिकेटसाठी सिरोंचा येथील चार खेळाडूंची निवड;मंत्री डॉ....

Gadchiroli dist News • टी-10 क्रिकेटसाठी सिरोंचा येथील चार खेळाडूंची निवड;मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम कडून आर्थिक मदत

80

Gadchiroli dist News
• टी-10 क्रिकेटसाठी सिरोंचा येथील चार खेळाडूंची निवड;मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम कडून आर्थिक मदत

सुवर्ण भारत:शंकर महाकाली ( संपादक)

अहेरी:आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील चार खेळाडूंची हिमाचल प्रदेश येथे होऊ घक्तलेल्या नॅशनल टी-10 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे.त्यांना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

हिमाचल प्रदेश येथे 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान होऊ घातलेल्या 19 वर्षीय वयोगटातील टी-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे.त्या स्पर्धेसाठी राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम गावातील बंटी समय्या पेडाकुला,श्रीशांत श्रीनिवास गट्टू,कार्तिक रवी निम्माला आणि फिरोज शमशेर खान या चार युवकांची निवड झाली आहे.

या खेळाडूंनी या अगोदर वरोरा येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भागातील युवकांना पहिल्यांदाच टी-10 क्रिकेट मध्ये खेळण्याची संधी मिळाली असून समस्त जिल्हा वासीयांसाठी गौरवाची बाब आहे.हिमाचल प्रदेश येथील कुल्लू दशहरा मैदानात हे चार युवक आपले क्रीडा कौशल्य दाखवणार आहेत.त्यांनी नुकतेच अहेरी येथील राजवाड्यात येऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेतली.

त्यांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी हिमाचल प्रदेश ला जाण्यासाठी आर्थिक मदत केली असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.यावेळी नगर सेवक सतीश भोगे, रवी सुलतान आणि सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.