Home Breaking News Gadchiroli Dist News • समाजात प्रत्येक घटक महत्वाचा;मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम ...

Gadchiroli Dist News • समाजात प्रत्येक घटक महत्वाचा;मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम • पद्मशाली समाजाच्या सभा मंडपाचे लोकार्पण संपन्न

32

Gadchiroli Dist News
• समाजात प्रत्येक घटक महत्वाचा;मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम

• पद्मशाली समाजाच्या सभा मंडपाचे लोकार्पण संपन्न

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

अहेरी: समाजाच्या जडण-घडणीत प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. या मार्गावर समाजातील विविधांगी घटकांमध्ये भेदाभेद करून चालणार नाही. सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे.त्यामुळे माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रत्येक समाजातील घटकाला सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

शनिवारी (२४ ऑगस्ट) अहेरी येथील पद्मशाली समाजाच्या सभा मंडपाचे लोकार्पण यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी सभा मंडप लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष मारोतराव पडालवार, सुरेश पसपूनुरवार,सुरेश अनमूलवार, अहेरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष राजू पडालवार,उपाध्यक्ष श्रावण दुडमवार,सचिव ओंकार भिमनपल्लीवार,कोषाध्यक्ष शिवकुमार भोगावार,महिला अध्यक्ष योगिता सामलवार,उपाध्यक्ष सरोजिनी गुंडावार,कोषाध्यक्ष रमा भोगावार, सचिव सविता पडालवार,आलापल्ली पद्मशाली समाजाचे अध्यक्ष बापूजी बत्तुलवार, उपाध्यक्ष मधुकर कोंगावार, सचिव जितेंद्र ओडपल्लीवार,देवलमरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष संतोष परसावार,उपाध्यक्ष गणेश दासरवार, सचिव गणेश कोपुलवार,इंदाराम पद्मशाली समाजाचे अध्यक्ष मल्लेश सामलवार,तसेच आदी पद्मशाली समाजाचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना मागील एका वर्षात विविध समाज बांधवांनी समाज मंदीर,संवरक्षण भिंत,सभा मंडप आणि आदी कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.त्या सर्व समाज बांधवांना पाहिजे ती निधी उपलब्ध करून देण्याचा काम माझ्याकडून करण्यात आला असून जवळ जवळ सर्वच बांधकाम पूर्णत्वास आले आहे.माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकही समाज बांधवाना मी नाराज केला नाही आणि यापुढे देखील कोणाला नाराज करणार नाही.तुमच्या आशीर्वादानेच मी मंत्री पदापर्यंत पोहोचलो त्यामुळे मला या समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा असून यापुढे देखील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अहेरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष राजू पडालवार यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची स्तुती करताना ‘दिलेला शब्द पाळणार नेता’ म्हणून एकाच शब्दावर निधी उपलब्ध करून दिली आणि लोकार्पण देखील त्यांनीच केली.त्यामुळे पद्मशाली समाजाला एक सुसज्ज भवन मिळाल्याचे सांगितले.एवढेच नव्हेतर समस्त पद्मशाली समाजातर्फे त्यांनी आभार देखील मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सामलवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पद्मशाली समाजातील बंधू-बघिनींनी सहकार्य केले.

पद्मशाली समाजातर्फे मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत
शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत टेकडी हनुमान जवळ असलेल्या मार्कंडेय मंदिर परिसरात विशेष अनुदान योजनेतून बांधकाम करण्यात आलेल्या सभा मंडपाचे मंत्री डॉ.आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.दरम्यान परिसरात त्यांचे आगमन होताच पद्मशाली समाजातील बघिनींनी औक्षण करून तर समाज बांधवांनी भला मोठा हार गळयात टाकत पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्कंडेय मंदिरात दर्शन घेऊन सभा मंडप आणि परिसराची पाहणी केली.