Home Breaking News Varora Taluka News • अंबुजा फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून करंजी येथील महिला बचत गटाने...

Varora Taluka News • अंबुजा फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून करंजी येथील महिला बचत गटाने केले पक्षी थांबे तयार

303

Varora Taluka News
• अंबुजा फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून करंजी येथील महिला बचत गटाने केले पक्षी थांबे तयार

वरोरा -विशेष प्रतिनिधी

वरोरा :अंबुजा फाउंडेशनच्या वतीने करंजी येथे कार्यरत असलेल्या प्रक्षेत्राधिकारी गायत्री श्रीरामे यांच्या मार्गदर्शनातून सावित्रीबाई महिला बचत गट (करंजी )येथील महिलांनी पाचशे पक्षी थांबे तयार केले आहेत.
किडीपासून होणारे नुकसान हे शेतकऱ्यांची एक मोठी डोकेदुखी आहे.किडी पासून पीकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी कीटनाशकांच्या वापरांसह अन्य पर्यायी उपाय करतो.

यापैकी शेतात पक्षी थांबे उभे करणे हे महत्त्वाचे ठरते.हानिकारक किडीपासून पीकांचे संरक्षण करण्यांमध्ये पक्षाची महत्त्वाची भूमिका असते शेतकऱ्यांना पक्षी थांबायचे महत्त्व अजूनही लक्षात आलेले नाही . पक्षी थांबल्यामुळे किडीपासून पीकांचे संरक्षण होते.

गाय,बगडे,वेडा,राघू,खाटीक, कोतवाल यासारखे अनेक पक्षी शेतामधील अळ्या व किडे वेचून खातात. कृषीतंत्राच्या मते सुमारे 33% नियंत्रण पक्षा मार्फत होऊ शकते .यामुळे पक्षाला आकर्षित करण्यासाठी शेतात पक्षी थांबे उभारावे. पक्षांना जर किडी अळ्या उपलब्ध झाल्या तर पीकांचे नुकसान करणार नाहीत .त्यामुळे शेतात पक्षी थांबे उभारणे आवश्यक असल्याचे मत प्रक्षेत्र अधिकारी गायत्री श्रीरामे यांनी व्यक्त केले.