Home Breaking News Varora taluka News • धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा:नयोमी...

Varora taluka News • धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा:नयोमी साटम( भा.पो.से.)

19

Varora taluka News
• धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा:नयोमी साटम( भा.पो.से.)

सुवर्ण भारत :खेंमचंड नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ‘ हा उत्सव सर्वांचा असून तो शांततेत व आनंदात पार पाडण्यासाठी, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक उत्सवात कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सर्वांनी अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनाला यथोचित सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम ( भा.पो.से.) यांनी येथे केले. आगामी ‘ गणेशोत्सव ‘ व ईतर धार्मिक उत्सव निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावेत यासाठी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात गणेश मंडळ, शातंता कमेटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

मंचावर उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे, तहसीलदार योगेश काटकर, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे. महावितरण कंपनीचे इंजि. सचिन बदखल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील बदकी, न.प.चे अधिकारी गजानन आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
साटम पुढे म्हणाल्या की, गणेशोत्सव साजरा करताना कुणाला एखाद्या ठिकाणी पोलिसांचा जास्तच दबाव आहे, त्यामुळे परिस्थिती चिघळू शकते असे वाटत असेल तर संबंधितांनी स्थानीय पोलीस निरीक्षक अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. सण साजरा करताना इतरांना त्रास होऊ नये, सोशल मिडियाच्या माध्यमातून कोणाचीही धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वनीचा अतिरेक टाळावा. शुभेच्छांचे बॅनर लावताना नगर परिषदेची रितसर परवानगी घ्यावी, असे निक्षून सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ.लंगडापुरे म्हणाल्या की, दरवेळेस गणेशोत्सव सणापूर्वी आवश्यक सुचना देण्यात येतात.सूचनांची उजळणी व्हावी, याच उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुका बघता १८ वर्षांवरील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे, याची खात्री करून घ्यावी, यादीत नाव नसल्यास आपले नाव नोंदणीसाठी अर्ज करावा. गणेश मंडळाने प्राधान्याने यासंदर्भात देखावा, जणजागृती केल्यास पुरस्कारासाठ त्यांची निवड होऊ शकते. सर्वांनी जबाबदारी ने उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी मंडळाला मार्गदर्शन सूचना दिल्या.त्यात सर्व गणेश म़डळांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परवानगी घ्यावी.पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी वॉटर प्रूफ आच्छादन लावावे. सभ्यतेची मर्यादा पाळा. अशोभनीय संगीत वाजवू नये. मसाला भात, पार्सल फुड, शीतपेये आदी वितरण करताना ते दर्जेदार असावी, याकडे लक्ष देत फुड पायझनिंग होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. गणेश मंडळाने प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, इत्यादी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्यात.
यावेळी आपल्या मनोगतात तहसीलदार काटकर, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता बदखल, सार्वजनिक बांधकाम अभियंता बल्की, न.प. अधिकारी आत्राम यांनी आवश्यक सूचना दिल्यात.
‘ गणेश विसर्जन’ ग्रामीण १७ सप्टेंबर व वरोरा शहर १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. निर्विघ्नपणे, उत्साहात हे सण साजरे व्हावेत, उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी गणेश विसर्जनाच्या प्रशासनाच्या निर्णयावर गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी, शांतता कमेटीतील सदस्यांनी सूचना करीत सकारात्मक चर्चा केली.
पोलीस प्रशासनातर्फे एपीआय उमेश नासरे, अनिल मेश्राम, गोपनीय विभाग प्रमुख राजेश वऱ्हाडे ,न.प.चे स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर इ.दी उपस्थिती होती.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गमे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, राजकीय पार्टीचे पदाधिकारी विलास नेरकर, रमेश राजूरकर,ओम मांडवकर, बाबा भागडे, जयंत टेमुर्डे, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तथा शांतता कमेटीचे सदस्य छोटुभाई शेख, राजेंद्र मर्दाने, प्रवीण खिरटकर, मारोतराव मगरे, नितेश जयस्वाल, मधुसूदन टिपले, विजय धोपटे, त्रिशूळ घाटे, मनीष जेठानी, शकील पटेल, प्रवीण सुराणा, रुपलाल कावळे, शाम ठेंगडी, लखन केशवाणी, गणेश मंडळाचे पदाधिकारी, स्वंयसेवी संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार व अन्य मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.
प्रास्ताविक व संचालन एपीआय उमेश नासरे यांनी केले. आभार एपीआय अनिल मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड, पोलीस पाटील इ.नी अथक परिश्रम घेतले.