Home Breaking News Gadchiroli Dist News • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सीमा...

Gadchiroli Dist News • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सीमा जयदेव बाला या महिलेला पुढील उपचारासाठी केली आर्थिक मदत.!

161

Gadchiroli Dist News

• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सीमा जयदेव बाला या महिलेला पुढील उपचारासाठी केली आर्थिक मदत.!

सुवर्ण भारत:शंकर महाकाली ( संपादक)

मूलचेरा:- तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भगतनगर या गावातील सीमा जयदेव बाला ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेन हॅमरेग या आजाराने त्रस्त आहे, तीला चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेक अडचणी होत आहेत.

      ही बाब स्थानिक कार्यकर्ते यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळवली,त्यावेळी राजे साहेबांनी भगतनगर येथील बाला कुटूंबातील सदस्यांना बोलावून त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना पुढील उपचारासाठी 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.त्यावेळी विवेकानंदपूर ग्रामपंचायत उपसरपंच तपन मल्लिक,किशोर मल्लिक,बाला कुटुंबातील सदस्य गण उपस्थित होते..!